Saturday, June 22, 2024
Homeपब्लिक फिगरजामनेरमध्ये रविवारी उसळणार...

जामनेरमध्ये रविवारी उसळणार कुस्तीप्रेमींचा जनसागर

येत्या रविवारी, ११ फेब्रुवारीला भारतातील रथी-महारथींमध्ये होणारी दंगल पाहण्यासाठी जामनेरमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळणार आहे. जागतिक कीर्तीच्या खासबाग आखाड्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या स्टेडियममुळे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक १३ कुस्ती, दंगली आणि त्याचबरोबर खानदेश आणि परिसरातील १००पेक्षा अधिक पैलवानांच्या द्वंद्वाचा आगळावेगळा अनुभव जामनेरकरांना लाभणार आहे.

कुस्ती

नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा, हा मंत्र भारतातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयामुळे राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे भारतातील सर्वात मोठ्या कुस्ती दंगलचे अर्थातच ‘नमो कुस्ती महाकुंभ’चे दिमाखदार आयोजन केले जात आहे. कुस्तीवर असलेले प्रेम आणि कुस्तीचा आखाडा गाजवण्यासाठी लालमातीत उतरणार्‍या दिग्गज पैलवानांमुळे या कुस्तीच्या कुंभाला पाहण्यासाठी उसळणार्‍या जनसागरासाठी तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक क्षमतेची आसनव्यवस्था गोविंद महाराज क्रीडांगणावर उभारण्यात आली आहे.

कुस्ती जगतातील रथी-महारथी एकाच वेळी एका मंचावर आणण्याचा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून रचला जाणार आहे. या एकदिवसीय दंगलीमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला आव्हान देण्यासाठी भारत केसरी बिनिया मिनने दंड थोपटले आहेत. तसेच महेंद्र गायकवाड (उप महाराष्ट्र केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी), विजय चौधरी (ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. मुस्तफा खान (जम्मू केसरी), प्रकाश बनकर (उप महाराषट्र केसरी) वि. भूपिंदर सिंह (भारत केसरी), किरण भगत (उप महाराष्ट्र केसरी) वि. गुरुजनट सिंह (पंजाब केसरी),  बालारफिक केसरी (महाराष्ट्र केसरी) वि. मनप्रीत सिंग (पंजाब केसरी), अजय गुज्जर (भारत केसरी) वि. माउली कोकाटे (उप महाराषट्र केसरी), सुमित मलिक (अर्जुन अवॉर्ड, हिंदकेसरी) वि. हॅपी सिंह (पंजाब केसरी), प्रितपाल सिंग वि. शंटी कुमार(दिल्ली केसरी),  समीर शेख (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. कलवा गुज्जर (भारत कुमार), जतींदर सिंह (रुस्तम ए पंजाब) वि. सत्येन्द्र मलिक (भारत केसरी), कमलजित (रुस्तम ए हिंद) वि. माउली जमदाडे (भारत केसरी) आणि रेहान खान (मध्य प्रदेश केसरी) वि. कमल कुमार (शेर ए पंजाब) या दिग्गजांच्या कुस्त्या क्रीडाप्रेमींना याची देही याची डोळा पाहता येणार आहे.

या दिग्गजांबरोबर खान्देश आणि परिसरातील १०० पैलवानसुद्धा या दंगलमध्ये आपल्या कुस्तीचे डावपेच दाखविणार आहेत. या मैदानात निवेदक म्हणून पै. सुरेश जाधव (चिंचोली), शरद भालेराव (जालना),  युवराज केचे हे उपस्थित कुस्तीप्रेमींना आपल्या मधाळ वाणीतून मंत्रमुग्घ करण्यासाठी सज्ज झाली आहेत. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध हलगीवादक सुनील नागरपोळे हलगीवादन करून कुस्तीप्रेमी आणि कुस्तीपटूंना प्रोत्साहित करण्याचे कर्तव्य बजावणार आहेत.

विजेते होणार लखपती

जामनेरमध्ये रंगणारी दंगल संस्मरणीय व्हावी म्हणून गिरीष महाजन यांनी १३ दंगलीतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव होणार असल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर विजेत्या खेळाडूला ३ किलो वजनाची चांदीची गदा आणि नमो कुस्ती महाकुंभ हा मानाचा पट्टाही बहाल केला जाणार असल्याचे सांगितले. अव्वल दंगलीतील पराभूत खेळाडूलाही रोख पुरस्कार दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी जामनेरमध्ये आपल्या मातीतील खेळाचे आयोजन करून तरुण पिढीला ‘नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा’ हा  संदेश आम्ही देणार आहोत. त्यामुळे जामनेरकरांनीr न भूतो न भविष्यति ठरणार्‍या कुस्तीच्या महाकुंभाचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Continue reading

न्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे शहर म्हणजे मुंबई

मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा 'ब्रेक थ्रू' आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक...

देशातल्या 8 लोकसभा मतदारसंघांच्या काही मतांची होणार पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे 8 आणि 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा तपशील पुढीलप्रमाणे: लोकसभा आम चुनाव 2024ईवीएम जांच...

कायद्याच्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी...
error: Content is protected !!