Monday, December 23, 2024
Homeहेल्थ इज वेल्थलवचिक अर्थव्यवस्थेसाठी उत्तम...

लवचिक अर्थव्यवस्थेसाठी उत्तम आरोग्यसेवा आवश्यक

कोणत्याही लवचिक अर्थव्यवस्थेसाठी तसेच त्याच्या समावेशक वाढीसाठी दीर्घकालीन घटकांसह एकमेकांशी जोडलेली उत्तम आरोग्यसेवाप्रणाली आवश्यक असते, ही बाब काल केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे.

सर्वांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या योजनांवर या अहवालात अधिक भर देण्यात आला आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत देशातील वंचित कुटुंबांना आजारपणासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतरची दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीवरील उपचारांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा पुरवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून 8 जुलै 2024पर्यंत 34.73 कोटी आयुष्मान भारत कार्डे तयार करण्यात आली आहेत आणि देशातील रुग्णालयांमध्ये 7.37 कोटी आजारी लोक उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी 49% लाभार्थी महिला आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

पंतप्रधान जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून गेल्या वर्षी एम्स देवघरमध्ये 10,000व्या जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले होते. या केंद्रांमध्ये 1965 प्रकारची औषधे आणि 293 प्रकारची शस्त्रक्रिया उपकरणे उपलब्ध आहेत. देशातील विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 300हून अधिक एएमआरआयटी म्हणजेच उपचारासाठी किफायतशीर दरातील औषधे आणि विश्वसनीय रोपण सामग्री औषधालये कार्यरत आहेत. गंभीर आजारांसाठी गरजूंना अनुदानित दरात औषधे मिळण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आयुष्मान भव अभियान सप्टेंबर 2023मध्ये सुरु करण्यात आले. हे अभियान देशभरातील सर्व गावे/लहान शहरे यांच्या ठिकाणी निवडक आरोग्यसुविधा सेवा पुरवणे तसेच सरकारच्या महत्त्वाच्या योजनांविषयी नागरिकांना माहिती देणे या उद्देशांसह सुरु करण्यात आले आहे. 31 मार्च 2024पर्यंत देशात आयोजित 25.25 लाख आरोग्य मेळाव्यांमध्ये एकूण 20.66 कोटी लोकांनी भाग घेतला.

देशभरात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्था उभारणे हा वर्ष 2021 मध्ये सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत डिजिटल अभियान, या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत 64.86 आयुष्मान भारत आरोग्य खाती (आभा) उघडण्यात आली आहेत. 3.06 लाख आरोग्य सुविधा नोंद्पुस्तिका सुरु करण्यात आल्या. 4.06 लाख आरोग्यसेवा व्यावसायिकांची नोंदणी करण्यात आली तसेच 39.77 कोटी आरोग्य नोंदी आभाशी जोडण्यात आल्या, असेही यात म्हटले आहे.

ई-संजीवनी, या वर्ष 2019मध्ये सुरु झालेल्या उपक्रमाला आता आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणून ओळखले जाते. दुर्गम भागातील रुग्णांना दूरदृश्य प्रणालीच्या मदतीने टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेने 9 जुलै 2024पर्यंत 15,857 केंद्रांच्या माध्यमातून सव्वा लाख आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांमध्ये 128 प्रकारच्या विशेष आरोग्य सेवांच्या संदर्भात 26.62 कोटी रुग्णांना आरोग्यसेवा पुरवली आहे, असेही या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. 

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content