Homeन्यूज अँड व्ह्यूजदिल्ली विधानसभा परिसरात...

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या ‘टाटा सफारी’ कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला आणि तिथून वेगाने पळ काढला. या घटनेमुळे दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, ही कार ‘सरबजीत सिंग’ नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे समजते. मात्र, कार चालवणारी व्यक्ती तोच होता का, याचा तपास सुरू आहे.

सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उत्तर प्रदेश पासिंगची एक पांढऱ्या रंगाची कार दिल्ली विधानसभेच्या गेट क्र. २ पाशी आली. हे गेट प्रामुख्याने व्हीआयपी लोकांसाठी वापरले जाते. कार चालकाने वेगाने कार चालवत लोखंडी गेट आणि तेथील बॅरिकेड्सना जोराची धडक दिली आणि गेट तोडून आत प्रवेश केला. आत शिरल्यानंतर चालकाने कार थेट विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांच्या कार्यालयाकडे नेली. तेथील पोर्चमध्ये त्याने एक पुष्पगुच्छ (बुके) ठेवला. हे कृत्य केल्यानंतर सुरक्षारक्षक त्याला पकडण्यापूर्वीच त्याने त्याच वेगाने कार माघारी फिरवली आणि गेटमधून बाहेर पडून पळ काढला.

पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून कारचा माग काढण्यासाठी संपूर्ण दिल्लीत नाकाबंदी करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने मास्क घातलेला होता, ज्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण जात आहे. दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या बजेट अधिवेशनादरम्यान बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे गेट तोडून आत शिरणे आणि वस्तू ठेवून निघून जाणे, याकडे सुरक्षायंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. हा केवळ खोडसाळपणा आहे की यामागे काही मोठा कट होता, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर विधानसभेच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content