३ व ४ मेला अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धा

येत्या ३ व ४ मे रोजी, सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत सुविद्या डिग्री कॉलेज, योजना‌ शाळा पटांगण, मागाठाणे बस डेपोजवळ, बोरीवली पूर्व, मुंबई याठिकाणी मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांबातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांना समर्पित “अजिंक्यतारा चषक – चतुर्थ वर्ष” मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरातील ४० संस्थांमधून अंदाजे ७०० खेळाडू यात सहभागी होणार आहेत. ६/८/१०/१२/१४/१६/१८ वर्षांखालील मुले आणि मुली असे खेळाडूंचे वयोगट आहेत. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मल्लखांब खेळातील पॅरा मल्लखांब वयोगटातील स्पर्धा घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूस अजिंक्यतारा पदक, सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येईल तसेच प्रत्येक वयोगटात वैयक्तिक पदकं, सांघिक चषक अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरातील नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि भविष्यात यातूनच अनेक पुरस्कारविजेते खेळाडू घडावेत हा स्पर्धा आयोजनाचा हेतू आहे. सुविद्या प्रसारक संघाचे सचिव मिलिंद जोशी, स्पर्धा सचिव संचिता देवल आणि स्पर्धाप्रमुख आशिष देवल व दुदम सरांचे विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही स्पर्धा पार पडणार आहे.

आधिक माहितीसाठी संपर्क- आशिष देवल (९६६४००२०५१)

1 COMMENT

  1. एक त्रुटी मात्र पाहायला मिळाली
    ज्याना तुम्ही पंच म्हणुन नियुक्त केलेत त्यांनी नवोदित खेळाडूंना दिलेल्या वागणुकीची मला कीव येते
    स्पर्धा 12 वर्षाखालील मुले
    1)स्पर्धक चुकला की काही पंचांच्या चेहर्‍यावर हास्य उमटण्याची कृती

    2)स्पर्धा संपल्यावर फक्त त्यांना आवडलेला स्पर्धक याला हस्तांदोलन करण

    तर जे स्पर्धक चांगलं perform नाही करू शकले त्या स्पर्धकांना हस्तांदोलन न करणे
    स्पर्धक पहिल्यांदा perform करत आहे हे नक्की यांना कळत नव्हते का?एक खेळाडू पंचा कडे हात पुढे केला पण पंचांनी त्याकडे दुर्लक्ष करून दुसर्‍या खेळाडूचे कौतुक करताना पाहायला मिळाले असे साधारणपणे 6 वेळा घडले कदाचित चष्मा घरी विसरून आले त की काय असे वाटले पण ज्याने चष्मा लावलेला तो पंच ही तसाच निघाला

    3)नवोदित स्पर्धकांना मिळालेली पंचांकडुन वागणूक मनाला चटका देऊन गेली

    खूपच छान नियोजन आज बर्‍याच वर्षानी पाहायला मिळाले आयोजक व स्पर्धक यांचा उत्साह मनाला भावला
    पुनश्च एकदा अभिनंदन व धन्यवाद
    असे उपक्रम पुन्हा पुन्हा आपण आयोजित करावेत या करीता शुभेच्छा

Comments are closed.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content