Homeचिट चॅटनावे नोंदवा मुंबई...

नावे नोंदवा मुंबई जिल्हा कॅरम स्पर्धेसाठी!

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने दशरथ येलवे यांच्या स्मरणार्थ ३२वी जुनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा एम. सी. ए. ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर, पश्चिम रेल्वे प्लेट फॉर्म क्रमांक ५ व व सेंट्रल रेल्वे प्लेट फॉर्म क्रमांक ८च्या मध्ये, शंकर मंदिराच्या बाजूला, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी आपल्या क्लबमार्फत आपली नावे २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८दरम्यान वरील पत्त्यावर नोंदवावीत.

१८ वर्षांखालील मुले व मुली तसेच २१ वर्षांखालील मुले व मुली अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतून ५८व्या जुनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. अधिक माहितीसाठी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सहसचिव संजय बर्वे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९१३७५७८९७८वर संपर्क साधावा.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content