Homeहेल्थ इज वेल्थआषाढी वारीत 14...

आषाढी वारीत 14 लाख भाविकांवर झाले मोफत उपचार

नुकत्याच झालेल्या आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमात 17 जुलैपर्यंत 13 लाख 96 हजार 72 वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले.

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातल्या विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या पालख्या आणि जवळजवळ एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना ही आरोग्यसेवा देण्यात आली.

आषाढी

वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला तर लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक पाच किलोमीटरवर एक आपला दवाखाना तयार करण्यात आला होता. वारीदरम्यान 6 हजार 368 आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविल्या. तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून 2,327 रुग्णांवर उपचार करण्यात आले. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 5 खाटांचे तात्पुरते अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्यात आले होते. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

आषाढी

या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्यसेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर ताप, सर्दी, खोकला, ड्रेसिंग, जुलाबचा त्रास झाल्यास सेवेसाठी दुचाकी रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर गर्दी जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठी रुग्णवाहिका फिरू शकत नाही. त्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. फिरत्या रुग्णवाहिकेबरोबरच 102 व 108 या रुग्णवाहिकाही पालखी मार्गावर सेवा देत होत्या. दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आले होते. रुग्णवाहिकेबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोयही करण्यात आली होती.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content