देशातल्या लोकसभा निवडणुकांचे साक्षीदार होण्यासाठी जगातल्या २३ देशांचे ७५ प्रतिनिधी सध्या भारतात आले असून महाराष्ट्रासह सहा राज्यांतल्या मतदानाची प्रक्रिया अनुभवणार आहेत.
निवडणूकविषयक एकात्मता आणि पारदर्शकतेचे निदर्शक म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात सर्वोच्च मापदंड धारण करणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे आयोजन करण्याप्रती कटिबद्धतेचे उदाहरण घालून देत या लोकशाही उत्कृष्टतेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांसाठी (ईएमबीज) ही संधी दिली आहे. सहभागाचे प्रमाण आणि आवाका यांच्या संदर्भात अशा
पद्धतीचा हा पहिलाच कार्यक्रम असून यामध्ये भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किरगीझ रिपब्लिक, रशिया, मोल्दोवा, ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलिपाईन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकिस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालदीव्ज, पापुआ न्यू गिनी आणि

नामिबिया अशा २३ देशांमध्ये कार्यरत ईएमबीज तसेच संबंधित संस्थांचे ७५ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. निवडणूक यंत्रणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानाचे (आयएफईएस) सदस्य तसेच भूतान आणि इस्रायल या देशांतील माध्यमांचे प्रतिनिधीदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
कालपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात परदेशातील जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या (ईएमबीज) प्रतिनिधींना भारतीय निवडणूक यंत्रणेतील बारकावे तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतर्फे अंमलात आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींविषयी अवगत करण्यात येईल. आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू कार्यक्रमात उपस्थित प्रतिनिधींना संबोधित करतील. त्यानंतर हे प्रतिनिधी लहानलहान गटांमध्ये विभागून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांना भेटी देण्यासाठी निघतील. हे सर्वजण तेथील निवडणूक प्रक्रिया आणि विविध मतदारसंघांमध्ये संबंधित तयारीचे निरीक्षण करतील. ९ मे रोजी या कार्यक्रमाचा समारोप होईल.