Saturday, September 14, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूज360 वन प्राइम लिमिटेडची...

360 वन प्राइम लिमिटेडची बीएसीवर नोंदणी

360 वन प्राइम लिमिटेड (पूर्वीची आयआयएफएल वेल्थ प्राइम लिमिटेड) या 360वन ग्रुपसाठी कर्जपुरवठादार कंपनी असलेल्या 360 वन डब्ल्यूएएम लिमिटेडच्या (पूर्वीची आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड) पूर्ण मालकीच्या उपकंपनीने मुंबई शेअर बाजारात नुकतेच सुरक्षित, रेटेड, नोंदणीकृतरिडीमेबलनॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची (एनसीडीज) सार्वजनिक विक्री केली.

बीएसई कन्व्हेन्शन हॉलमध्ये हा नोंदणी समारंभ पार पाडला. पहिल्याच दिवशी कंपनीला १६६० कोटी रुपयांचे बिड्स मिळाले आणि त्यातून मूलभूत विक्रीच्या आठपट आणि एकूण विक्री काराच्या १.६६पट विक्री झाली. संस्थात्मक, कॉर्पोरेटवैयक्तिक (एचएनआय) आणि रिटेल अशा सर्व विभागांमध्ये पहिल्याच दिवशी ६५५० अर्जांसह अतिरिक्त विक्री झाली.

विक्रीच्या अखेरपर्यंत मिळालेले एकूण बिड्स १,७१६.५३ कोटी रुपये (एकूण विक्रीच्या १.७२ पट आणि मूलभूत विक्री ८.५८ पट) होते. सिक्युरिटीज वितरित करणाऱ्या आलेल्या एकूण वैध अर्जदारांची एकूण संख्या ७८७२ होती. प्रत्येकी १००० रुपये दर्शनीमूल्य असलेल्या एनसीडीची एकूण किंमत १००० कोटी रुपये असून ते १८, २४, ३६ आणि ६० कालावधीचे आहेत. त्यामधील सर्व आठ सीरीजमध्ये मासिक आणि वार्षिक व्याज पेमेंट पर्याय देण्यात आला आहे.

एनसीडीमध्ये २०० कोटी रुपयांच्या बेस इश्यू साइज आणि ८०० कोटी रुपयांपर्यंतच्या ग्रीन शू ऑप्शनचा समावेश असून एकत्रित किंमत १००० कोटी रुपये आहे. ९.६६ टक्के प्रती वर्ष व्याज कूपन दरामुळे गुंतवणुकदारांना गुंतवणुकीची आकर्षक संधी मिळणार असून तो कंपनीच्या ऑनवर्ड कर्ज, वित्त/सद्य कर्जदारांसाठी रिफायनान्सिंग आणि कॉर्पोरेट कारणे इत्यादीचा भाग आहे.

आपल्या पहिल्या यशस्वी सार्वजनिक एनसीडी विक्रीबाबत 360 वन चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण भगत म्हणाले की, 360 वन प्राइमच्या पहिल्या सार्वजनिक एनसीडीज विक्रीच्या पहिल्याच दिवशी झालेली अतिरिक्त विक्री गुंतवणुकदारांना 360 वन ब्रँडवर गुंतवणुकदारांना असलेला विश्वास दर्शवणारी आहे. भांडवलासाठी वेगवेगळे मार्ग आजमावत असतानाच 360 वन प्राइमच्या पहिल्या सार्वजनिक एनसीडी विक्रीत दाखवलेला विश्वास आमच्या व्यवसायाला चालना देणारा आहे.

360 वन प्राइम लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण वेळ संचालक हिमांशू जैन म्हणाले की, मुंबई शेअर बाजारात आमच्या एनसीडीची झालेली नोंदणी 360 वन प्राइमसाठी लक्षणीय टप्पा आहे. पहिल्याच दिवशी झालेली अतिरिक्त विक्री आमची रिस्क अंडररायडिंग क्षमता आणि इतक्या वर्षांत अ‍ॅसेटचा दर्जा राखण्याच्या आमच्या बांधिलकीवर बाजारपेठेला असलेला विश्वास दर्शवणारी आहे. आमची कठोर प्रक्रिया त्रुटी कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त कर्जवसुली करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली असून ती दमदार व कार्यक्षम व्यावसायिक कामकाजासाठी आवश्यक फ्रेमवर्क देणारी आहे.

विक्रीचे प्रमुख व्यवस्थापक जेएम फायनान्शियल लिमिटेड, ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, हे आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीज ही सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (मर्चंट बँकर्स) रेग्युलेशन, १९९२ अमेंडेड (मर्चंट बँकर्स रेग्युलेशन्स)नुसार विक्रेत्याची असोसिएट आहे. त्याशिवाय रेग्युलेशन २१एच्या तरतुदींचे पालन करत आणि मर्चंट बँकर्स रेग्युलेशन्सच्या एक्सप्लेनेशननुसार आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड विक्रीच्या कोणत्याही प्रकारच्या मार्केटिंगमध्ये सहभागी होणार नाही आणि रेग्युलेशन २५ (३) सेबी एनसीएस रेग्युलेशन्सनुसार नियमपालनाचे प्रमाणपत्र वितरित करता कामा नये.

एनसीडीजना क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडद्वारे क्रिसिल एए/स्टेबल आणि आयसीआरए लिमिटेडतर्फे [ICRA]AA (स्टेबल) रेटिंग देण्यात आले असून त्यावरून उच्च दर्जाची सुरक्षा आणि कमी कर्ज जोखीम अधोरेखित होते. अधिक माहितीसाठी कृपया २८ डिसेंबर २०२३ तारखेचे Tranche I माहितीपत्रक आणि कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले शेल्फ माहितीपत्रक पाहावे.

Continue reading

नोटा उडवणाऱ्या शिवसैनिकांची होणार हकालपट्टी!

ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या तालावर नोटा उधळणाऱ्या कथित शिवसैनिकांची चौकशी चालू असून या लोकांना पक्षातून ताबडतोब काढून टाकले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. https://youtube.com/shorts/AEdfBCtuU4Y मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात आणि त्यांच्या दैवताच्या आनंदाश्रमात केवळ पैसेच उडवले...

वांद्र्याचा नाला खुलला बोगनवेलीने..

मुंबईतल्या पश्चिम महामार्गावर खेरवाडीजवळ असलेला जवळजवळ अर्धा किलोमीटरचा नाला अलीकडे नव्याने बंद करण्यात आला. या नाल्यावर मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने नुकतेच सुशोभिकरण केले. बहरलेल्या बोगनवेलीच्या झाडांनी तसेच टोपियारींनी हा नाला आता असा खुलून...

मुंबईत ईदची सुट्टी १८ तारखेला!

राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवार, १६ सप्टेंबरऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद, हा मुस्लिमधर्मियांचा सण मुस्लिम...
error: Content is protected !!
Skip to content