Thursday, January 23, 2025
Homeबॅक पेजमुथ्थुट फिनकॉर्प उभारणार ३००...

मुथ्थुट फिनकॉर्प उभारणार ३०० कोटी!

मुथ्थुट फिनकॉर्प लिमिटेड, या १३६ वर्ष जुन्या मुथ्थुट पप्पाचान समूहाच्या (मुथ्थुट ब्लू) प्रमुख कंपनीने सिक्युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्सची (एनसीडी) XVI Tranche III सीरीज जाहीर केली असून त्याद्वारे ४०० कोटी रुपयांची उभारणी केली आहे. तिसऱ्या खंडाच्या (Tranche) वितरणाची किंमत ७५ कोटी रुपये असून २२५ कोटी रुपयांच्या ग्रीनशू पर्यायासह एकूण रक्कम ३०० कोटी रुपये (Tranche III Issue) असेल. तिसऱ्या खंडाच्या विक्रीचे दर्शनी मूल्य प्रत्येक एनसीडीसाठी १००० रुपये असून ते आज १२ जानेवारी २०२४ रोजी खुले झाले आहे. २५ जानेवारी २०२४पर्यंत खुले राहील. संचालक मंडळाने मान्यता दिल्यास किंवा रीतसर स्थापन केलेल्या समितीने मंजूर केल्यास लवकर बंद होईल. त्यासाठी रेग्युलेशन ३३ ए, सिक्युरिचीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (नॉन- कन्व्हर्टिबल सिक्युरिटीजची विक्री आणि नोंदणी) रेग्युलेशन २०२१च्या आवश्यक संमतीची गरज असेल.

तिसऱ्या खंडातील एनसीडीची विक्री २४ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि ९६ महिने कालावधीच्या पर्यायांसह मासिक, वार्षिक आणि एकत्रित पेमेंट पर्याय – I, II, III, IV, V, VI, VII, VIII, IX आणि X यांसह उपलब्ध असून ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे निवड करता येईल. X चा पर्याय सर्व प्रकारच्या गुंतवणुकदारांसाठी ५० कोटी, परिणामकारक उत्पन्न (प्रती वर्ष) एनसीडीधारकांसाठी ९.२६ टक्के ते ९.७५ टक्के या श्रेणीदरम्यान मर्यादित असेल. तिसऱ्या खंडात विक्री करण्यात आलेल्या सिक्युअर्ड एनसीडीला क्रिसिलतर्फे AA-/Stable रेटिंग देण्यात आले असून बीएसईच्या डेट मार्केटअंतर्गत नोंदणीसाठी प्रस्तावित आहे.

हे एनसीडीच्या XVI सीरीजमधील आम्ही विक्री करत असलेले तिसरे असून आमच्या सद्य आणि संभाव्य ग्राहकांना भारतातील आमच्या ३६००पेक्षा जास्त कोणत्याही शाखेला भेट देऊन किंवा मोबाइल एप मुथ्थुट फिनकॉर्प वनमधूनही एनसीडीमध्ये गुंतवणूक करता येईल. AA-/Stable क्रिसिल रेटिंगसह विक्रीला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आमची अपेक्षा असून हा निधी यापुढील कर्ज उपक्रमांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे, असे मुथ्थुट फिनकॉर्प लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाजी वर्गीस म्हणाले.

Continue reading

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला. सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या...

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड,...

घोष ट्रॉफी क्रिकेटः डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियनही उपांत्य फेरीत

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी.ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल...
Skip to content