Saturday, July 27, 2024
Homeटॉप स्टोरीप्रमुख शहरांमधल्या घरांच्‍या...

प्रमुख शहरांमधल्या घरांच्‍या भाडेदरांत २५ ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ

२०१९पासून प्रमुख शहरांमधील टॉप मायक्रो-मार्केट्समधील घरांच्‍या भाडेदरांमध्‍ये २५ ते ३० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. दरम्‍यान, २०१९च्‍या महामारीपूर्वीच्‍या काळाच्‍या तुलनेत प्रमुख ८ शहरांमधील निवासी मालमत्तांसाठी सरासरी मासिक भाडेदरांमध्‍ये १५ ते २० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. भाडेदरांमधील या वाढीचे श्रेय भाडेउत्‍पन्‍नांतील पुरेशा वाढीला जाते. हे सकारात्‍मक ट्रेण्‍ड्स असतानादेखील न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि सिंगापूर अशा जागतिक रिअल इस्‍टेट हब्‍सच्‍या तुलनेत मोठ्या प्रमाणात पोकळी आहे. या सर्व बाबी हाऊसिंग डॉटकॉमच्‍या अहवालामधून निदर्शनास आल्‍या आहेत.

देशातील आघाडीचे रिअल इस्‍टेट टेक व्‍यासपीठ हाऊसिंग डॉटकॉमचा नवीन अहवाल ‘रेसिडेन्शियल रेण्‍ट्स ऑन द राइज! ए रिपोर्ट ऑन रेण्‍टल प्रॉपर्टी इन इंडिया’ निदर्शनास आणतो की, मासिक सरासरी भाडेदरामधील वाढ भांडवल मूल्‍यांमधील वाढीपेक्षा उच्‍च आहे. प्रमुख शहरांमधील मालमत्ता किमतींमध्‍ये २०१९च्‍या महामारीपूर्वीच्‍या काळाच्‍या तुलनेत १५ ते २० टक्‍क्‍यांची वाढ झाली, तर सरासरी मासिक भाडेदरांमध्‍ये २५ ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तसेच सेवा क्षेत्रातील अग्रणी शहरांमधील विशिष्‍ट प्रमुख ठिकाणी याच कालावधीदरम्‍यान भाडेदरांमध्‍ये ३० टक्‍क्‍यांची मोठी वाढ दिसण्‍यात आली.

हाऊसिंग डॉटकॉम आयआरआयएस इंडेक्‍समधून निदर्शनास आले की, महामारीनंतरच्‍या काळात मध्‍यम भाडेदरासह घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीत वाढ झाली आहे. हे इंडेक्‍स व्‍यासपीठावरील ऑनलाईन सर्च क्रियाकलापावर देखरेख ठेवत आगामी मागणीबाबत माहिती देते. या इंडेक्‍समधून निदर्शनास येते की, महामारीनंतरच्‍या काळात ऑनलाईन रेण्‍टल सर्च क्रियाकलापामध्‍ये गृहखरेदीच्‍या तुलनेत वाढ झाली आहे. सध्‍या भाडेदरासाठी आयआरआयएस इंडेक्‍स २३ पॉइण्‍ट्सवर आहे, जो घर खरेदी करण्‍याबाबतच्‍या इंडेक्‍सच्‍या तुलनेत उच्‍च आहे.

हाऊसिंग डॉटकॉम, प्रॉपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल म्‍हणाले की, महामारीनंतर खरेदी व भाड्याने देण्‍यासंदर्भात घरांच्‍या मागणीमध्‍ये वाढ झाली आहे. गृहनिर्माण बाजारपेठेतील किमतींत गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये मोठी वाढ झाली आहे, जी जवळपास दशकाएवढी आहे. शहरामध्‍ये सरासरी किंमत वाढ पुरेशा प्रमाणात आहे, पण काही प्रमुख शहरांमध्‍ये वाढ मोठ्या प्रमाणात आहे.

हाऊसिंग डॉटकॉम येथील संशोधन प्रमुख अंकिता सूद म्‍हणाल्‍या की, उच्च व्याजदर आणि संपादन खर्च यांसारख्या कारणांमुळे भारतातील भाडे परतावा ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. पण मालमत्तेच्‍या वाढत्‍या किमती, संभाव्य खरेदीदारांसाठी परवडण्‍याच्‍या बाबतीतील आव्हाने आणि तयार सदनिकांबाबत यादीचा मर्यादित पुरवठा यासह महामारीनंतर घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. गुरूग्राम, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद यांसारख्या सेवा क्षेत्रातील प्रबळ शहरांच्या सीबीडीमध्ये २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ दिसण्‍यात आली आहे.

अधिक पुढे जात, पुढील २ ते ३ वर्षांमध्‍ये बाजारपेठेत नवीन तयार सदनिकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात असणार आहे, ज्‍यामुळे आम्‍हाला घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीमधील वाढ कायम राहण्‍याची अपेक्षा आहे. या शाश्‍वत वाढीमुळे मध्‍यम व दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्‍ये रूची निर्माण झाली आहे, ज्‍यामधून रेण्‍टल बाजारपेठेत उदयोन्‍मुख संधी दिसून येत आहेत, असेही सूद पुढे म्‍हणाल्‍या.

हाऊसिंग डॉटकॉम रिसर्चनेदेखील भारतातील प्रमुख गृहनिर्माण बाजारपेठेतील भाडे परताव्‍यांचा प्रमुख जागतिक शहरांमधील भाडे परताव्‍यांसोबत तुलना करण्‍यासाठी किंमत-ते-भाडे गुणोत्तरचे गणन केले आहे. विशिष्‍ट भौगोलिक क्षेत्रामधील मध्‍यम मालमत्ता मूल्‍याला मध्‍यम वार्षिक भाडेदराने भागाकार करत किंमत-ते-भाडे गुणोत्तर निर्धारित केले जाते. कमी किंमत-ते-भाडे गुणोत्तर म्‍हणजे मालमत्ता मालकांसाठी उच्‍च भाडे उत्‍पन्‍न किंवा गुंतवणूकीवर उच्‍च परतावा. हे गुणोत्तर मालमत्ता खरेदी करण्‍याच्‍या तुलनेत भाड्याने देण्‍यासंदर्भातील स्‍पर्धात्‍मक किफायतशीरपणाचे मूल्‍यांकन करण्‍यामध्‍ये मदत करते.

किंमत-ते-भाडे गुणोत्तर – संपूर्ण विश्‍व वि. भारत 

अनु. क्र. शहर देश किंमत-ते-भाडे गुणोत्तर 
न्‍यूयॉर्क युनायटेड स्‍टेट्स १७
टोकियोजपान४२
लंडनयुनायटेड किंग्डम२४
दुबईयूएई१५
पॅरिसफ्रान्स३१
सियोलदक्षिण कोरिया४०
सिंगापूरसिंगापूर२३
सिडनी ऑस्ट्रेलिया२९
मुंबई (एमएमआर*) भारत३५
१०नवी दिल्लीभारत३७
११नोएडाभारत३३
१२गुरुग्रामभारत३६
१३पुणेभारत३१
१४हैदराबादभारत२५
१५बेंगळुरूभारत२५
१६मेलबर्नऑस्ट्रेलिया२१
१७हॉंगकॉंग चीन३६

मुंबई महानगर क्षेत्रामध्‍ये मुंबई, ठाणे व नवी मुंबई यांचा समावेश आहे. 

स्रोत: रेसिडेन्शियल रेण्‍ट्स ऑन द राइज! ए रिपोर्ट ऑन रेण्‍टल प्रॉपर्टी इन इंडिया २०२४, हाऊसिंग रिसर्च

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!