Friday, December 13, 2024
Homeडेली पल्स१०० ते १०४...

१०० ते १०४ वर्षांच्या आजींनीही बजावला मतदानाचा हक्क

लोकसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता २० मे रोजी मतदान होणार असून यासाठी कालपासून गृहमतदानाला सुरूवात झाली. प्रत्यक्ष मतदानाला जाऊ न शकणाऱ्या वृद्ध तसेच आजारी, दिव्यांग मतदारांकडून निवडणूक आयोगाकडून गृहमतदान करवून घेतले जात आहे. या प्रक्रियेत मुंबईतल्या विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे आजीने मतदान केले. वडाळ्यात १०० वर्षांच्या पार्वती शेषानंद यांनी मतदानाचा हक्क बजावला. १०४ वर्षे वयाच्या लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनीही दहिसरमध्ये गृहमतदानाचा हक्क बजावला.

आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईल असेच वाटत होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाही, मतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई आजीने व्यक्त केला.

मुंबईतल्या वडाळा विधानसभा मतदारसंघामधील १०० वर्षाच्या पार्वती शेषानंद यांनी तर दहिसर विधानसभा मतदारसंघात 104 वर्षांच्या लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी गृहमतदानाचा हक्क बजावला. गृहमतदान प्रक्रियेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान पूर्णतः अडचणमुक्त आणि सुरळीत झाले आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाकरिता एकूण 68 नोंदणीकृत पात्र मतदार आहेत. यापैकी एकूण ६५ नोंदणीकृत पात्र मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण १८२ ज्येष्ठ आणि ८ दिव्यांग मतदार गृहमतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. आजपर्यंत १५० मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. उद्या १५ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदान

विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि तीन दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५८ ज्येष्ठ नागरिक तर एक दिव्यांग मतदार आहे. यापैकी ५० ज्येष्ठ नागरिक आणि एक दिव्यांग असे एकूण ५१ मतदारांनी गृहमतदान केले.

घाटकोपर पूर्व येथे २८ पैकी २७ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३७ मतदार गृहमतदान करणार आहेत. त्यापैकी ३५ जणांनी गृहमतदान केले असल्याची माहिती एस.ए.खानविलकर यांनी दिली. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९ मतदार गृहमतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. यापैकी सात जणांनी मतदान केले.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट मुंबई उत्तर मतदारसंघात समाविष्ट विधानसभेच्या दहिसर मतदारसंघात गृहमतदानासाठी 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली होती. त्यातील आज जे मतदार मतदान करू शकले नाहीत, ते 16 मे 2024 रोजी मतदान करू शकणार आहेत, असे निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content