Friday, February 14, 2025
HomeArchiveव्हर्चुअल ग्रुप डिस्कशन...

व्हर्चुअल ग्रुप डिस्कशन स्पर्धा ‘ग्रिड’चे आयोजन

Details
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतातील प्रिमियर ऑनलाइन जॉब रेडिनेस आणि प्लेसमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या सेफजॉबने ‘द ग्रेट इंडियन डिस्कशन अर्थात ग्रिड’ ही भारतातील पहिली व्हर्चुअल ग्रुप डिस्कशन स्पर्धा नुकतीच आयोजित केली. या स्पर्धेत देशभरातील ७० शहरांमधील ३,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात दिल्ली युनिव्हर्सिटी, गॅलगोटिअस युनिव्हर्सिटी, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, आयटीएम युनिव्हर्सिटी इत्यादीसारख्या शीर्षस्थ संस्थांसह ५०० कॉलेजचा समावेश होता.”
 
“डीएव्ही कॉलेजची प्रियंका पाठक या बौद्धिक स्पर्धेची लाइव्ह डिस्कशनची विजेती ठरली. प्रथम आणि द्वितीय उपविजेत्यांत अनुक्रमे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीची उर्वी काथुरिया आणि आयएएमआर कॉलेजचा शिवम गोयल यांचा क्रमांक लागला. विजेत्यांना ३०,००० रूपये, २०,००० रूपये आणि १०,००० रूपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तथापि या यशातील सर्वात मोठी प्राप्ती म्हणजे, संपूर्ण स्पर्धेतील त्यांचा शिकण्याचा अनुभव. सेफजॉब टीमचे मार्गदर्शन आणि मदतीने मुलाखती आणि इंटर्नशिप मिळण्याची संधी ही आहे.”
 
अशा प्रकारच्या स्पर्धांद्वारे सेफजॉबला देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यातील तरुण भारतीयांना कौशल्य विकसित करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे. विशेषत: सध्याच्या संकटाच्या काळात तरुणांना व्यावसायिक करिअर तसेच कॉर्पोरेट नोकऱ्यांसाठी सज्ज होण्यास मदत करण्याचा उद्देश यामागे होता.
 
“सहभागींची क्षमता तपासण्यासाठी, त्यांच्याकडून नव्या कल्पना घेण्यासाठी, दैनंदिन घडामोडींशी संबंधित विषयांवर सामूहिक चर्चा करण्याचा एक जागरूक प्रयत्न करण्यात आला. यापैकी काही चर्चेत आत्मनिर्भर भारत योजाना, नैराश्याची कारणे व ते कसे टाळता येईल? फेसबुक आणि जिओ डील- चांगली की वाईट?, कोरोनानंतरचा भारत: बचावात्मकतेकडून भरभराटीकडे, भारतीय राजकारणात सोशल मीडियाची भूमिका, उच्च शिक्षण की कौशल्य संपादन- भारताच्या वृद्धीसाठी उत्कृष्ट चालक कोण? इत्यादी विषयांचा समावेश होता.”

Continue reading

मोदींचा मास्टरस्ट्रोक: 26/11चा मास्टरमाईंड राणाच्या प्रत्यार्पणास ट्रम्पची मंजुरी

26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज, 14 फेब्रुवारीला पहाटे या प्रत्यार्पणास मान्यता दिली. 26/11...

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...
Skip to content