HomeArchiveवित्तीय आणि मेटल...

वित्तीय आणि मेटल स्टॉक्सची दमदार कामगिरी!

Details
  

 
केएचएल न्यूज
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतीय निर्देशांकांनी आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय आणि मेटल स्टॉक्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वाढ नोंदवली. निफ्टी ०.४६% किंवा ५२.३५ अंकांनी वाढला व ११,३२२.५० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५९% किंवा २२४.९३ अंकांनी वाढला व ३८,४०७.०१ अंकांवर स्थिरावला.”
 
“एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की, आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १५५९ शेअर्सना नफा झाला, ११४६ शेअर्स घसरले तर १४३ शेअर्स स्थिर राहिले. झी एंटरटेनमेंट (५.१६%), अॅक्सिस बँक (३.९२%), जेएसडब्ल्यू स्टील (३.९४%), बीपीसीएल (३.५%) आणि इंडसइंड बँक (२.५०%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर श्री सिमेंट्स (३.८७%), टायटन कंपनी (३.५७%), युपीएल (२.३३%), डॉ. रेड्डीज (१.९६%) आणि सिपला (२.०९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी आणि फार्मा व्यतिरिक्त सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यापार केला. बीएसई मिडकॅप ०.२० टक्क्यांनी तर बीएसई स्मॉलकॅप ०.२३ टक्क्यांनी घसरला.”
 
बँक ऑफ बडोदा लिमिटेड: बँकेने जून तिमाहितील उत्पन्न घोषित केले. यात २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहित निव्वळ तोटा ८६४.३ कोटी रूपये झाल्याचे नोंदवले. यानंतर कंपनीचे स्टॉक २.७८% नी घसरले व त्यांनी ४७.२० रूपयांवर व्यापार केला.
 
“बॉश लिमिटेड: कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने एकत्रित निव्वळ तोटा १२१.५ कोटी रूपये झाल्याचे नोंदवले. कंपनीचा महसूलदेखील ६४% नी घटला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स २.४८% नी घसरले व त्यांनी १३,२५५ रूपयांवर व्यापार केला.”
 
“जेएसडब्ल्यू स्टील: कंपनीचे कच्चे स्टील प्रॉडक्शन वार्षिक स्तरावर ५% नी घसरले. तथापि, कंपनीचे स्टॉक्स ३.९४% नी वाढले व त्यांनी २५४.८५ रूपयांवर व्यापार केला.”
 
“टायटन कंपनी: कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहितील निव्वळ तोटा २७० कोटी रूपये झाला. तर या काळातील महसूल ६२.३% नी घसरला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ३.५७% नी घसरले व त्यांनी १,०६८.०० रूपयांवर व्यापार केला.”
 
भारतीय रूपया: देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये खरेदी दिसून आल्याने भारतीय रूपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज ७४.७७ रूपयांचे मूल्य अनुभवले.
 
जागतिक बाजार: प्रादेशिक आर्थिक कामकाजात सुधारणा आणि टेक्नोलॉजी शेअर्सच्या मागणीत वाढ झाल्याने आशियाई बाजारात सकारात्मक हालचाली दिसून आल्या. युरोपियन मार्केदेखील उच्चांकी स्थितीत बंद झाले. एफटीएसई १०० चे शेअर्स २.३९%नी वाढले तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स २.८८%नी वाढले. निक्केई २२५ चे शेअर्स १.८८% वाढले तर हँगसेंग कंपनीचे शेअर्स २.११%नी वाढले तर नॅसडॅकचे शेअर्स ०.३९%नी घटले.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content