Saturday, July 27, 2024
HomeArchiveपॅरा ऑलिम्पिक वर्ल्डकप...

पॅरा ऑलिम्पिक वर्ल्डकप २०१९ मध्ये अनुराधाची झेप

Details

 

 
 
बुलढाण्यातील अनुराधा पंढरी सोळंकी या दिव्यांग महिलेने पॅरा ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या इतिहासात व्हिलचेअरवरील तलवारबाजीच्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणाऱ्या पहिल्या दिव्यांग महिलेचा मान मिळवला आहे. 
 

पॅरा ऑलिम्पिकमधील व्हिलचेअर तलवारबाजी वर्ल्डकप २०१९ स्पर्धेच्या रँकिंगमध्ये ती ५४ व्या रँकवर आहे. भारताकडून या खेळात रँकिंगमध्ये येणारी ती पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे. १२ नोव्हेंबर २०१९ ते १८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत नेदरलॅण्ड येथे ही स्पर्धा पार पडली. आता तिची निवड थायलंड येथे होणाऱ्या व्हिलचेअर तलवारबाजी वर्ल्ड गेम २०२० मध्ये झाली आहे. ही स्पर्धा दिनांक २० फ्रेबुवारी २०२० ते २८ फ्रेबुवारी २०२० या कालावधीत होईल. 
 
 
अनुराधा ही बुलढाण्यातील पाटोदा गावची कन्या. घरची परिस्थिती एकदमच हलाखीची. वडिल दुसऱ्याच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे जेमतेम अडीच एकर शेती आहे व त्यावर एकत्र परिवाराची जबाबदारी वडिलांवर आहे. अनुराधा २ वर्षांची असतानाच पोलिओमुळे तिचा डावा हात कायमचा निकामी झाला. त्यातही वडिलांनी तिला शिकवले. तिने शिक्षणात एम.ए.ची पदवी मिळवली आईसोबत मजूरी करत तीने आपली फी भरली. 

 
“गणेश जाधव, पॅरा ऑलिम्पिक, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांनी अनुराधाला अपंगासाठीच्या खेळांची माहिती दिली. त्यानंतर तिचे महाराष्ट्राच्या पहिल्या दिव्यांग महिला क्रिकेट संघात सिलेक्शन झाले व राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये गोलदांजी करत २ विकेटही तिने घेतल्या. महाराष्ट्र राज्याचा संघ पहिल्यांदा अशा स्पर्धेत सहभागी होऊन जिकंला होता. त्यानंतर तिची सिटींग व्हॉलीबॉलमध्ये राज्यस्तरावर निवड झाली. यात बुलढाणा जिल्हा उपविजेता संघ ठरला. कामगिरीचा विचार करता तिची निवड राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघात झाली. तिथे मात्र महाराष्ट्र संघाला हार पत्करावी लागली.”
 
 
“त्याबरोबर गोदिंया जिल्हयात पार पडलेल्या राज्यस्तरीय व्हिलचेअर तलवारबाजी स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. नंतर राष्ट्रीय स्तरावर व्हिलचेअर तलवारबाजीच्या तिन्ही प्रकारात तीन कांस्य पदक मिळवले. त्यानंतर ‘पीसीआय’मार्फत आंतराष्ट्रीय व्हिलचेयर तलवारबाजीसाठी तिची निवड झाली. आपल्या यशाचे श्रेय ती गणेश जाधव, संतोष शेजवळ (तलवारबाजी कोच), आई वडील, मित्रपरिवार, मार्गदर्शक, सर्व सहकारी यांना देते. ”
 
 
 

“या स्पर्धेला जाण्याचा सर्व खर्च तिला स्वतः करायचा होता. सहित्यही स्वतःचे लागणार होते. त्यासाठी तिला महाराष्ट्र शासनाने एक लाख रूपयांची मदत तसेच बाकी मदत प्रतिष्ठीत व्यक्ती, सहकारी बँक, मित्रपरिवार, सहकारी इत्यादींकडून उपलब्ध झाल्याचे अनुराधा यांनी सांगितले. ”

  
“आता थायलंडसाठी निवड झाली आहे. पण, यासाठी मुख्य प्रश्न आहे सहित्याचा. तिला सहित्य मिळून देण्यासाठी व आपल्या महाराष्ट्र, देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सहकार्य करावे, अधिक माहितीसाठी संपर्क करावा. मोबाईल नंबर ९९३८ ५६२२३१.”
 
 
 

Continue reading

मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत रमेश खरेंना सुवर्णपदक

मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विप्ड आणि अनईक्विप्ड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. पेणच्या हनुमान व्यायामशाळेत सराव करणाऱ्या रमेश उर्फ आप्पा खरे यांची निवड 66 किलो वजनी...

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...
error: Content is protected !!