Monday, November 4, 2024
HomeArchiveकॉन्वेजिनियसची भारतभरात #एडटेकफॉरनयाभारत'...

कॉन्वेजिनियसची भारतभरात #एडटेकफॉरनयाभारत’ मोहीम!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
कॉन्वेजिनियस हे एडटेक सोशल एंटरप्राइज सध्याचे शिक्षण आणि कौशल्यातील फरक कमी करण्यासाठी प्रयत्न करते. तंत्रज्ञान प्रणित शिकण्या-शिकवण्याच्या किफायतशीर साधनांद्वारे ही कंपनी आता संपूर्ण भारतभरात विस्तृत अशी #एडटेकफॉरनयाभारत’ मोहीम लाँच करत आहे. या मोहिमेअंतर्गत, सोशल एंटरप्राइज उच्च दर्जाचे शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेच्या तळाशी असलेल्या १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना आवश्यक संसाधने पुरवणार आहे.
 
ऑनलाईन शिक्षणात संसाधनांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा एक मोठा समूह शिक्षणापासून वंचित राहिला. यापैकी बहुतांश विद्यार्थी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील आहेत तसेच सरकारी किंवा परवडणाऱ्या खासगी शाळेत शिकतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉन्वेजिनियसने आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा इत्यादी राज्यांशी करार केला आहे. ते विविध कोर्पोरेट्स, एनजीओ आणि परवडणाऱ्या खासगी शाळांसोबत काम करून वैयक्तिकृत आणि अनुकूलन करण्याच्या शिक्षण पद्धती कुठेही, कोणत्याही वेळी प्रदान करतात.
 
कॉन्वेजिनियसचे संस्थापक जयराज भट्टाचार्य म्हणाले की, “या मोहिमेचा उपयोग अल्पसंख्यांक लोकसंख्येच्या एका मोठ्या समुहावर प्रभाव पाडेल. त्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचे फायदे आणि नूतनाविष्कार प्रदान केले जातील. जेणेकरून ते समान संसाधनांद्वारे ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करू शकतील. याद्वारे त्यांना समृद्ध जीवन जगण्यास मदत होईल. कॉन्वेजिनियसमध्ये आम्ही, देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी संपूर्णपणे समर्पित आहोत.”
 “

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content