Saturday, July 27, 2024
HomeArchiveएनएसएनआयएस पटियालाचे प्रशिक्षण...

एनएसएनआयएस पटियालाचे प्रशिक्षण निकष शिथिल!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
प्रथमच 2020-21 सत्रापासून पटियाला येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (एनएसएनआयएस) येथे क्रीडा प्रशिक्षणातील महत्त्वाकांक्षी पदविका अभ्यासक्रमासाठी 46 प्रख्यात धावपटूंना महिला आणि पुरूष दोन्ही, थेट प्रवेश मिळेल. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी मे महिन्यात हा निर्णय जाहीर केला होता. आता अभ्यासक्रमात प्रख्यात धावपटूंचा मोठा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने यापूर्वी नमूद केलेल्या प्रवेशाच्या निकषांपैकी काही निकष शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता सर्व नामांकित धावपटूंसाठी 10+2 राहील. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या निकषात बदल करण्यात आले आहेत जेणेकरून आशियाई आणि राष्ट्रकुल पदकविजेते आणि वरिष्ठ जागतिक अजिंक्य स्पर्धेतले सहभागी मोठ्या संख्येने या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील. यापूर्वी उमेदवाराला वरिष्ठ जागतिक अजिंक्य स्पर्धेमध्ये पदक मिळवणे अनिवार्य होते. मात्र नवीन निकषात ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता तेदेखील अर्ज करण्यास पात्र आहेत. आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या निकषाऐवजी यापैकी कुठल्याही स्पर्धेत कोणतेही पदक- सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक विजेता असा बदल करण्यात आला आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले प्रसिद्ध धावपटू या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास आपोआप पात्र ठरतात.
 

 
 
या निर्णयाबद्दल बोलताना भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान म्हणाले की, “भारताच्या वाढत्या क्रीडा परिसंस्थेच्या उदयोन्मुख गरजा भागवण्याची वाढती गरज आणि देशातील सर्वोत्तम प्रतिभावान खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी मार्गदर्शन अभ्यासक्रमात प्रख्यात भारतीय धावपटूंचा समावेश महत्त्वाचा आहे. प्रख्यात धावपटूंसाठी प्रवेश निकष शिथिल केल्यामुळे त्यांच्यापैकी अनेकजण या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.””
 
46 नामांकित धावपटूंची निवड 23 क्रीडा प्रकारांसाठी (प्रत्येक प्रकारात 1 पुरूष, 1 महिला प्रशिक्षक) केली जाईल आणि त्यांना प्रवेश परीक्षेला हजर राहवे लागणार नाही कारण अभ्यासक्रमाच्या इतिहासात प्रथमच ही परीक्षा ऑनलाईन करण्यात आली आहे. सर्व प्रख्यात धावपटू ज्यांची या अभ्यासक्रमासाठी थेट निवड झाली आहे त्यांना इतर उमेदवारांबरोबर वैद्यकीय आणि शारीरिक चाचणी द्यावी लागेल. जर दोन नामांकित धावपटू एकाच क्रीडा प्रकारासाठी अर्ज करत असल्यास अंतिम उमेदवार निवडण्यासाठी गुणव्यवस्था ठेवली आहे. प्रख्यात धावपटूंसाठी निकष शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमासाठी नावनोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
 
प्रख्यात धावपटूंव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी कोरोना महामारीच्या सद्यस्थितीच्या अनुषंगाने असा निर्णय घेण्यात आला आहे की, जे उमेदवार पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत किंवा जर त्यांनी प्रवेश घेतलेल्या विद्यापीठांनी अद्याप पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली नसेल असे उमेदवारदेखील पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना 30 सप्टेंबर 2020पर्यंत अंतिम वर्ष उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
 “

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!