HomeArchiveइनोव्हेटिव्ह स्टुडंट प्रोजेक्ट्स...

इनोव्हेटिव्ह स्टुडंट प्रोजेक्ट्स पुरस्कारासाठी नामांकने आमंत्रित

Details

 
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत भारतीय अभियांत्रिकी राष्ट्रीय अकादमी या स्वायत्त संस्थेने इनोव्हेटिव्ह स्टुडंट प्रोजेक्ट्स पुरस्कार 2020 साठी नामांकनपत्रे मागविली आहेत.
 
“या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तीन श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रकल्प पात्र असतील– अंतिम वर्ष (चौथे वर्ष) बी.ई., बी.टेक. किंवा बी.एसी. (अभियांत्रिकी) शैक्षणिक वर्ष 2019-20साठी 31 जुलै 2020पर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प, 2019-2020 या शैक्षणिक वर्षादरम्यान 1 जुलै 2019 ते 31 जुलै 2020पर्यंत एम.ई. किंवा एम.टेक., एम.एसी. (अभियांत्रिकी) विद्यार्थ्यांचे तपासलेले प्रबंध, 1 जून 2019 ते 31 मे 2020पर्यंतचे तपासलेले प्रबंध पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त आहेत/शिफारस केली आहे.”
 
“अभियांत्रिकी संस्थांमधील पदवीधर, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांमधील कोणत्याही विद्यार्थ्याने हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण आणि कल्पक संशोधन प्रकल्पाची निवड करण्यासाठी आयएनएईने 1998मध्ये इनोव्हेटिव्ह स्टुडंट प्रोजेक्ट्स पुरस्काराची स्थापना केली. हा पुरस्कार विशेषत: उद्योग, संशोधन प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संस्थांमधील संयुक्त प्रकल्पांना प्रोत्साहित करतो. युवा प्रतिभेला प्रोत्साहित करून त्यांना मान्यता आणि प्रोत्साहन प्रदान करण्याचा हा एक प्रयत्न आहे. गेल्या बावीस वर्षांत पुरस्काराला मिळालेला प्रतिसाद बऱ्यापैकी उत्साहवर्धक असला तरीदेखील अकादमीला समाज आणि व्यवसायातील मोठ्या भागापर्यंत व्यापक स्तरावर पोहोचण्याची इच्छा आहे.”

“नामनिर्देशन पत्र मुख्याध्यापक, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा संस्थेचे संचालक किंवा निबंधक यांनी पाठवावे जिथे उमेदवाराने पदवी पुरस्कारासाठी आपला प्रकल्प/प्रबंध तयार केला असेल. उमेदवार सध्या कार्यरत असलेल्या संस्थेद्वारे नामनिर्देशन पत्र पाठवू नये. अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्थांकडून पदवीधर, पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट स्तराशी संबंधित प्रकल्प/प्रबंधासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.”
 

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content