Saturday, July 27, 2024
HomeArchive'आंतरराष्ट्रीय योग दिना'च्या...

‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने..

Details
kalpana.tendulkar25@gmail.com

 
आज संपूर्ण जग योग दिवस साजरा करत आहेत. पाच हजार वर्षांपासून ‘योग’ हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. योग हे आपल्या शरीरापासून रोगाला केवळ दूर ठेवत नाही तर मनाला शांतीही देते.

 
 
‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आला. २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत सर्वांनी एकाचवेळी योग करायचे असे सांगितले होते. त्यानंतर या महासभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी या प्रस्तावाचा स्वीकार केला आणि तेव्हापासून योग दिवसला मान्यता मिळाली.
 
“२१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्याचे ठरविण्यात आले, कारण या दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे. २१ जून हा दिवस पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. याला ग्रीष्म संक्रांती असेपण संबोधले जाते. भारतीय परंपरेनुसार ग्रीष्म संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणायनास सुरूवात करतो. सूर्य दक्षिणायनाची वेळ ही आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी लाभदायक वेळ आहे, म्हणून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ‘योग’ दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.”
 
“२१ जून २०१५ला पहिला “”आंतरराष्ट्रीय योग दिवस”” साजरा करण्यात आला. याचदिवशी दोन नवीन रेकॉर्डपण झालेत. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दिल्ली येथे राजपथावर ३५९८५ लोकांनी योगासने केली. हा पहिले रेकॉर्ड, व दुसरा रेकाँर्ड ८४ देशांतील लोकांनी यात सहभाग घेतला होता.”
 
“संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना मोदी म्हणाले की, ‘योग’ हे भारताच्या प्राचीन परंपरांनी जगाला दिलेली एट भेट आहे. योग हे मनुष्य आणि प्रकृती यांच्यात एक दुवा साधणारे एक माध्यम आहे. योग चांगले विचार आणि संयम ठेवण्यास मदत करतेच, पण चांगले आरोग्य आणि एक समग्र दृष्टीकोनही प्रदान करते. योगाकडे फक्त व्यायामाचा प्रकार म्हणून पाहिले जाऊ नये. मानवाच्या आतील एकतेची भावना, सबंध जगाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टीकोन, प्रकृतीचा नवीन शोध घेण्याची त्याची क्षमता इ. विविध पैलूंकडे बघण्याचा एक उदात्त दृष्टीकोन योगात सामावलेला आहे. ते समजण्याची आणि त्याची जाणीव निर्माण करण्याची ताकद फक्त योगातच आहे.”
 
“मानवाची जीवनशैली बदलण्याचे काम योग करते. आंतरराष्ट्रीय मानवतावादी ध्यान व योग गुरू श्री श्री रवीशंकर आणि अन्य योग गुरू यांनीदेखील २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस मानला जावा यासाठी सूचना दिल्या होत्या. योग विश्वविद्यालय, बेंगळुरू येथे एक सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात श्री श्री रवीशंकर, संस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग, चुन चुन गिरी मठाचे स्वामी श्री बालगंगाधरनाथ, स्वामी परमात्मानंद, हिंदू धर्म आचार्य सभेचे महासचिव बी. के. एस. अय्यंगार, स्वामी रामदेव, पतंजली योगपीठ, हरीद्वार, डॉ. नागेंद्र विवेकानंद विश्व विद्यालय बेंगळुरू, जगतगुरू अमृत सूर्यानंद महाराज, पोर्तुगाली योग परिसंघाचे अध्यक्ष अवधूतगुरू दिलीपजी महाराज, सुबोध तिवारी विश्व योग समुदाय, कैवल्यधाम योग संस्थेचे अध्यक्ष डॉ. डि. एन. कार्तिकेय, डॉ. रमेश बिजलानी, श्री अरविंदाश्रम, नवी दिल्ली हे सर्व या सभेस उपस्थित होते.”
 
“संयुक्त राष्ट्रसंघात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या प्रस्तावास १७७ देशांनी मान्यता दिली. आतापर्यंत मांडल्या गेलेल्या प्रस्तावात सर्वाधिक देशांनी मान्यता दिलेला हा पहिलाच प्रस्ताव. मोदींनी हा प्रस्ताव दिल्यापासून ९० दिवसांच्या आत तो मंजूर झाला. संयुक्त राष्ट्रसंघात कमी दिवसांत मंजूर होणारा हा पहिलाच प्रस्ताव. ह्या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर श्री श्री रवीशंकर यांनी मोदींचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, कोणत्याही धर्म, संस्कृतीसाठी राज्याचे संरक्षण असणे खूप महत्त्वाचे असते. त्याच्याशिवाय जगणे मुश्कील आहे. योगदर्शन हे असेच आतापर्यंत अनाथ होते. त्याला त्याचे अस्तित्त्व नव्हते. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या मान्यतेमुळे योगास आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. आता संपूर्ण विश्वात योगाचा प्रचार व प्रसार होईल. योगाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की, योग तुम्हाला एखाद्या निष्पाप लहान मुलासारखे बनवते. ज्याठिकाणी योग आणि वेदांत आहे, त्याठिकाणी काहीच कमी नसते. तिथे अशुद्धता, अज्ञानता आणि अन्याय, याला थारा नसतो. आपल्याला प्रत्येकाच्या दारात योग घेऊन जायचे आहे आणि प्रत्येकाचे दुःख दूर करावयाचे आहे.”
 
“२०१६मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’निमित्त आयुष मंत्रालयाने चंदिगडमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. द नॅशनल इव्हेंट ऑफ मास योगा डेमोंस्ट्रेशन, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीपण सहभागी झाले होते. जास्तीतजास्त युवक यात सहभागी झाले होते. ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’मध्ये नंतर सूर्य नमस्कार व श्लोकांचा समावेश करण्यात आला. मुस्लिम समाजातील लोकांनी यात सहभागी व्हावे म्हणून आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी मुस्लिमांना श्लोकाऐवजी अल्लाहचे काही वाक्य म्हणावयास सांगितले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने, सूर्य नमस्कार आमच्या धर्माविरूध्द आहे असे म्हटले आहे.”
 

Continue reading

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...

पेटीएमने संपादित केला १५०२ कोटींचा कार्यसंचालन महसूल

पेटीएमने आर्थिक वर्ष २०२४-२०२५च्‍या पहिल्‍या तिमाहीच्या आर्थिक निकालांची घोषणा केली आहे, ज्‍यामधून कंपनीच्या विविध घटकांमधील सुधारणा निदर्शनास येते. कंपनीने १,५०२ कोटी रूपयांच्‍या कार्यसंचालन महसूलासह ७९२ कोटी रूपयांच्‍या ईबीआयटीडीए तोट्याची नोंद केली आहे. कंपनीसाठी अलीकडच्या व्‍यत्‍ययांचा संपूर्ण आर्थिक परिणाम आर्थिक...

साहिल नायरनी लाँच करताहेत ‘मिला ब्‍युटी’..

भारतातील सर्वात लोकप्रिय ब्‍युटी ब्रँड्सचे धोरणात्‍मक समर्थक साहिल नायर त्‍यांचा नवीन उद्यम 'मिला ब्‍युटी' (पूर्वीचा मिलाप कॉस्‍मेटिक्‍स) लाँच करण्‍यासाठी सज्‍ज आहेत. व्‍यवस्‍थापकीय संचालक व सहसंस्‍थापक म्‍हणून साहिल भारतातील ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाईन करण्‍यात आलेल्‍या सर्वोत्तम दर्जाच्‍या, नाविन्‍यपूर्ण...
error: Content is protected !!