Homeन्यूज अँड व्ह्यूजसावकाश.. खेळ गतीमान...

सावकाश.. खेळ गतीमान होत आहेत!

जागतिक पातळीवर १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत दर चार वर्षांनी काही मिलीसेकंद कमी झालेले दिसतात. फूटबॉल किंवा हॉकी या क्षेत्रातही खेळाची गती वाढत चालली आहे असे प्रेक्षक म्हणून आपल्यालाही जाणवत असेल. ज्यांनी यापूर्वीच्या पिढीचे हे खेळ पाहिले असतील त्यांना तर हा फरक निश्चित जाणवत असेल. आजच्या खेळांमध्ये गती हा सर्वात मोठा घटक झाला आहे. तुम्ही जर खेळांशी संबंधित भूतकाळातील यूट्यूब वाहिन्यांचा आढावा घेतलात तर असे दिसेल की, हे खेळ याच खेळांच्या आधुनिक आवृत्तीपेक्षा खूपच संथ असल्याचे सुरुवातीलाच लक्षात येईल. जाणकार मंडळींचे तर म्हणणे असेही आहे की केवळ खेळाडूंची गतीच नव्हे तर चेंडूच्या गतीतही बदल झाला आहे. कारण एकच.. बहुतांश खेळांचीच गती सातत्याने वाढते आहे.

ही गती वाढण्याचे नेमके कारण काय असावे किंवा अमुक एका खेळासाठी गती किती असावी याबद्दल स्पष्ट उल्लेख आढळत नाहीत. मात्र खेळामध्ये आज चेंडूची गती मोजली जाते हे निश्चित. फूटबॉलच्या खेळात चेंडू सुयोग्य खेळाडूकडे देणे अथवा ‘पास’ करणे हे अतिशय महत्त्वाचे समजले जाते. जेव्हा खेळाडू आपल्याजवळ चेंडू कमी वेळ ठेवतो तेव्हा ‘पास’ करण्याची गती साहजिकच वाढणार. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये किमान ७० टक्के ‘पास’ यशस्वी होणे आवश्यक मानले आहे. चेंडूची वाढलेली गती आणि खेळाडूची मात्र साधारण गती असे प्रकार फूटबॉल आणि बास्केटबॉल या प्रकारात घडताना दिसतात. गतिमान खेळ आणि अधिक मोठी मध्यंतरे गेल्या काही दशकात बघायला मिळाली. हॉकीच्या एका प्रेक्षणीय सामन्यात प्रत्येक चमू किमान ३०० वेळा आपल्या खेळाडूंना मध्यंतरे देते असे पाहिले गेले. ही मध्यंतरे गेल्या १० वर्षांत ४५ सेकंदाची झाली आहेत. यामुळेही सामन्याची गती वाढते असे सांगितले जाते.

काही खेळांमध्ये सामन्याची गती वाढवण्यासाठी आणि गुण मिळवण्यासाठी नियमामध्येही बदल करून घेतात. वर्ल्ड कपच्या अलीकडील सामन्यांमध्ये चेंडूची गती पुरुषांच्या खेळात ७ टक्के तर महिलांच्या खेळात १८ टक्के वाढलेली दिसली. याचा अर्थ असा की महिलांमध्ये गती अधिक करू शकण्याची नैसर्गिक उर्मी असावी. जलद आणि आक्रमक खेळाची गरज ही त्यातील गुण मिळवण्याच्या अपेक्षेतून होत असावी. चेंडू खेळत राहणे आणि अचूकता यामुळे प्रतिपक्षाला आपले संरक्षण मजबूत करण्यासाठी वेळ मिळत नाही. साहजिकच त्याचे संरक्षण कमी पडते. गतिमान खेळासाठी जलद आणि अचूक निर्णय महत्त्वाचे असतात. चेंडू येत असताना गोलकीपरने योग्य जागी पोहोचण्याची काळजी घेतली पाहिजे आणि हे अचूक निर्णयाविना अशक्य आहे.

उत्तम खेळाडूमध्ये संपूर्ण शारीरिक क्षमता आणि खास अधिक शक्तीचे प्रयत्न पुन्हापुन्हा करून दाखवण्याचीही क्षमता असायला हवी. हे असेल तर पूर्ण शक्ती वापरता येते आणि चुकाही कमी होतात असे तज्ज्ञांचे मत आहे. काही खेळांमध्ये तर इतर बाबींच्यासोबत हुतुतू अथवा कबड्डी अशा क्षेतातील खेळाडूला प्रतिपक्षाच्या एखाद्या पकडीमधून सुटण्यासाठी अथवा त्यावर कुरघोडी करण्यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक ठरते. परंतु नेहमीच जलद गती फायदा देते असेही म्हणता येत नाही. त्यात धोकेही असू शकतात. त्यामुळे खेळ जसा चालला असेल त्यानुसार आपली गती ठेवून प्रतिपक्षाला आपल्या जवळपास येऊ देणे टाळता येते, अधिक गतीचा एक मोठा धोका म्हणजे यात दुखापती खूप जास्त होऊ शकतात. खेळाडू एकमेकांवर आदळणे आणि त्यात दुखापत होणे आपण पाहिले आहे. खेळाडू आपली शारीरिक आणि सहन करण्याची शक्ती प्रयत्नाने वाढवू शकतात. परंतु गती अशी वाढवता येत नाही असे म्हटले जाते.
गेल्या काही काळात पुरुषांच्यासोबत महिलांनीही व्यावसायिक खेळात नाव कमावले आहे. त्यामुळे येत्या काळात महिलांच्या स्पर्धा अधिक गतिमान होतील असा अंदाज करायला हरकत नसावी..

Continue reading

टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्समधले सोने मिळवले तरी दागिने महागच!

फार पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे फार बोजड असत आणि त्यामुळे ती सहजपणे हातात मावत नव्हती. त्यानंतर १९६०च्या दशकात हातात वागवण्यासारख्या स्वरुपात ट्रांझिस्टर नावाचे एक उपकरण बाजारात आले. त्यापूर्वी रेडिओ म्हणजे घरच्या टेबलावर किंवा कपाटात ठेवून त्यावर कार्यक्रम ऐकता येत...

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...
Skip to content