Tuesday, September 17, 2024
Homeडेली पल्सकोणत्याही काळात मनोबल...

कोणत्याही काळात मनोबल वाढविण्यासाठी.. (भाग-२)

२९ मे रोजी सद्गुरू श्री वामनराव पै यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने कोरोनाच नव्हे तर कोणत्याही काळात मनोबल वाढविणारा हा विशेष लेख!

जीवनविद्येची विश्वप्रार्थना मानवधर्माचा पुरस्कार करणारी असल्याने ती खऱ्या अर्थाने शंभर टक्के धर्मातीत (secular) आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक व्यक्तीला आपापला तथाकथित धर्म (so-called religion) ‘सांभाळून’ ही प्रार्थना म्हणता येण्यासारखी आहे. केवळ माझ्या धर्मातील लोकांचे कल्याण व्हावे, एवढ्यापुरताच हा विचार सीमित नसून इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, हे सत्य डोळ्यांसमोर ठेवून अखिल मानवजातीचे कल्याण चिंतणारा व मानवामानवात सुसंवाद साधणारा व स्नेहबंध निर्माण करणारा हा एक दिव्य अलौकिक विचार आहे.

विश्वहिताकडून व्यक्तिहिताकडे

सर्वसामान्यत: म्हटली जाणारी प्रार्थना आत्मकेंद्रित (self centered) किवा व्यक्तिभिमुख (individualistic, self oriented) अशी असते. उदाहरणार्थ, प्रार्थनेत मला नोकरीधंद्यात यश प्राप्त होऊ दे, माझ्या कुटुंबाचा आजार दूर होऊ दे असा संकुचित याचनेचा भाव असतो. वास्तविक पहाता निसर्ग नियमानुसार ‘केवळ माझ्यासाठी’ (exclusiveness) असा प्रकार अस्तित्त्वात असणं कालत्रयीही शक्य नाही. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला जे काही मिळणार असतं ते समाजातील इतर व्यक्तींच्या माध्यमातूनच.

उदाहरणार्थ, कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्या कुटुंबातील व समाजातील इतर व्यक्ती सुदृढ, निरोगी व ठणठणीत प्रकृतीच्या असतील तरच त्या व्यक्तीचा आजार दूर करता येणे शक्य होईल. म्हणजेच विश्वात इतरत्र सुबत्ता व समृद्धी असेल तरच व्यक्तीची उणीव व कमतरता भरून येणे शक्य होईल. जीवनविद्येच्या व्याखेनुसार, ‘निसर्गनियमांसहित नैसर्गिक, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर आणि या व्यवस्थेशी सुसंगत जीवन जगणे म्हणजेच परमेश्वराची उपासना.

‘फक्त मला, फक्त माझ्यासाठी’ असा संकुचित भाव असलेली प्रार्थना निसर्गनियमांशी विसंगत असल्याने ती खऱ्या अर्थाने ‘उपासना’ नसते. व्यक्तीकडून विश्वाच्या दिशेने प्रसरण पावणारी जीवनविद्येची व्यापक विश्वप्रार्थना अखिल मानवजातीचे कल्याण साधणारी आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, “All expansion is life; all contraction is death.” म्हणजेच व्यापक होणे म्हणजे जीवन जगणे आहे तर आकुंचन पावणे हे मृत्युसमान आहे.

मनोबल

संकुचित विचार म्हणजे आकुंचन होय. म्हणून केवळ मलाच सूर्याचा प्रकाश मिळू दे, केवळ मला पावसाचे पाणी मिळू दे अशा अर्थाचा विचार निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाणारा तर आहेच, शिवाय प्रचंड अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचे अवमूल्यन करणारा आहे. जीवनविद्येच्या विश्वप्रार्थनेत विश्वातील व्यापकतेला, समृद्धतेला आवाहन केले आहे व विश्वकल्याणात व्यक्तिकल्याण सामावले हा दिव्य विचार जोपासला आहे.

अहंकारशून्य पुण्यसंचय

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी। असे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातून वारंवार बजावून सांगितले आहे. म्हणजे पुण्यसंचयासाठी नामस्मरण हा एक उत्तम मार्ग आहे हे सोदाहरण पटवून दिले आहे. प्रस्तुत विश्वप्राथनेतही नामस्मरण असल्याने पुण्यसंचयाचा हा एक सोपा परंतु अत्यंत प्रभावी व परिणामकारक असा मार्ग आहे. पुण्यसंचय करताना अहंकाराचा वारा लागू देऊ नये, असा सावधानतेचा इशाराही सर्व संतांनी सर्वसामान्यांना दिला आहे.

बऱ्याचदा पुण्यसंचय करण्याच्या प्रक्रियेत हा इशारा विसरला जातो आणि मग ‘मीपणा’ डोकं वर काढतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या व्यक्तीस आर्थिक, शारीरिक, मानसिक मदत केली तर नंतर कितीतरी दिवस, कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी केवळ ‘मी होतो म्हणून तो वाचला’ असं पालुपद चालू राहते. म्हणजेच ज्या व्यक्तीला आपण मदत केली त्या व्यक्तीचे कनिष्ठत्व व आपले त्याच्या तुलनेतील श्रेष्ठत्व याचे चिरंतन स्मरण आपल्याला सतावत राहतं. अशा वेळेस ‘तू केवळ निमित्तमात्र होतास’ या भगवद्गीतेतील बोधवचनाचा आपल्याला विसर पडतो.

जीवनविद्येच्या विश्व प्रार्थनेमुळे मात्र पुण्यसंचय होत असतानाच अहंकारही लोप पावतो. आपण म्हटलेल्या प्रार्थनमुळे निर्माण झालेली शुभचिंतनाची स्पंदने सूक्ष्मपणे संबंधितांपर्यंत पोहोचून त्यांचे अपेक्षित कल्याण साधले जाते. मात्र इतर स्थूल बाबींप्रमाणे ते थेट दृष्य व व्यक्त नसल्याने दुसऱ्यांचे कल्याण साधण्याच्या प्रक्रियेत मोलाचा हातभार लावूनदेखील ‘केवळ माझ्यामुळे तुझं भलं झालं’ असा अहंकाराचा वारा लागत नाही.

मनोबल

स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, “तुम्ही गुहेत राहत असाल तरी तुमचे विचार खडकांच्या भिंती भेदून बाहेर पडतील.. विचारांचे, हृदयातील कळकळीचे व हेतूच्या विशुद्धतेचे सामर्थ्य हे असे आहे.” हे विश्वकल्याणाच्या विशुद्ध हेतूने भारलेल्या स्पंदनांची विश्वप्रार्थनेद्वारे निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला त्याचा क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्गनियमांनुसार अपेक्षित प्रतिसाद मिळणार हे निश्चितच!

सुबोध व स्पष्ट मागणी

‘Ask and ye shall be given’

अर्थात ‘मागाल तसे मिळेल’ असं म्हटलं जातं. अर्थातच त्यासाठी मागणी स्पष्ट व निःसंदिग्ध असावयास हवी. लहानपणापासून आपण शिकलेल्या बऱ्याचशा प्रार्थना संस्कृतमध्ये असल्याने अर्थ समजावून न घेता त्या पाठ व सपाट झाल्या आहेत. त्यातील आशय, त्यातील भावार्थ समजावून न घेताच केवळ उपचार म्हणून यांत्रिकतेने प्रार्थना म्हणून लाभ होण्याची शक्यता फार कमी असते.

आपण काय मागतो हेच जर निश्चित (specific) नसेल तर त्याला प्रतिसादरूपाने मिळणारे फळ तरी निश्चित कसे बरे असेल? म्हणूनच आपण काय मागत आहोत याची स्पष्ट जाणीव प्रार्थना म्हणणाऱ्यास असेल तर “क्रिया तशी प्रतिक्रिया” या न्यायाने प्रतिसाद रूपाने मिळणारा प्रसादही अपेक्षेप्रमाणे चांगलाच असेल.

(पुढे चालू)

Continue reading

व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व  भगवद्गीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे  म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दांत म्हणायचे तर गुरुपौर्णिमा  म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरु. प्रथम गुरु. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आईवडिलांनी एखादी गोष्ट मला करायला सांगितली पण  माझ्या गुरुंनी करू नकोस असे सांगितले तर ती गोष्ट मी करणार नाही....

गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व भगवद्गीता महाभारतात आहे. महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आई-वडिलांनी एखादी गोष्ट मला करायला सांगितली पण माझ्या...

गुरुपौर्णिमा, अर्थात कृतज्ञता दिन!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद,  अठरा पुराणे व भगवदगीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वांना परिचित आहेत. आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरू महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यासजयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आईवडिलांनी एखादी  गोष्ट मला करायला सांगितली, पण माझ्या गुरुंनी करू नकोस असे सांगितले तर ती गोष्ट मी करणार नाही. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट मला...
error: Content is protected !!
Skip to content