Tuesday, September 17, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजदिव्यांग ऑलिम्पिकची सत्तर...

दिव्यांग ऑलिम्पिकची सत्तर वर्षे…

दिव्यांग ऑलिम्पिकची सत्तर नाही तर केवळ ६४ वर्षे झाली आहेत हे मान्य असले तरी दिव्यांग खेळांचा इतिहास नक्की सत्तर वर्षांचा आहे. या इतिहासाची सुरुवात १९४८मध्ये होते. एका समाजाने १९४८ सालीच सुरु केलेल्या स्टोक मान्देव्हिल दिव्यांग खेळाचा उद्घाटन समारंभ लंडन येथे संपन्न झालेल्या १९४८च्या ऑलिम्पिकच्या दिवशीच झाला होता. या दिव्यांग खेळांची पार्श्वभूमी अर्थातच दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी काही उपयुक्त स्पर्धा असाव्यात अशी होती.

पहिल्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धा इटलीच्या रोम शहरात १८ ते २५ सप्टेंबर १९६० या कालावधीत म्हणजे मुख्य ऑलिम्पिक संपल्यानंतर सहा दिवसांनी सुरु झाल्या. यामध्ये पाठीच्या मणक्याची दुखापत हे एकच अपंगत्व सामील केले गेले होते. या स्पर्धांमध्ये २३ देशाच्या ४०० खेळाडूंनी भाग घेतला होता. इतिहास बघायचा तर भारताने सर्वप्रथम १९६८ साली झालेल्या तेल अवीव येथील दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या दोन महिला खेळाडूंसह १० स्पर्धकांना स्पर्धेत पाठवले होते. जर्मनीच्या हायडेलबर्ग येथील १९७२च्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मुरलीकांत पेटकर यांनी ५० मीटर्स फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३१ सेकंद अशी वेळ नोंदवून जागतिक विक्रमासह ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावले होते.

लंडनमधील २०१२च्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धांनी जनमानसाची दिव्यांग खेळाची मानसिकता बदलली असे म्हणावे लागेल. ब्रिटनच्या एका वृत्तवाहिनीने दिव्यांग ऑलिम्पिकचा सुंदर प्रचार सुरु केला. “हे दिव्यांग नाहीत तर विलक्षण मानव आहेत”, असे त्यांनी मांडले आणि त्याला लोकांनी भरपूर प्रतिसाद

दिला. २०१२च्या या स्पर्धा १०० देशांमध्ये प्रसारित केल्या गेल्या आणि जवळजवळ ४ अब्ज प्रेक्षकांनी या थरारक स्पर्धांचा आस्वाद घेतला. संशोधनातून असे सिद्ध झाले की दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धांनी दिव्यांगांची कामगिरी मान्य केली.

हा मजकूर आपण वाचत असाल तेव्हा या वर्षीच्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धां कदाचित संपणार असतील. परंतु याचनिमित्ताने या वर्षी पॅरिसमध्ये या ७० वर्षांची दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धांची कामगिरी दाखवणारे एक अप्रतिम प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात माणूस आपल्या अपंगत्वावर मात करण्यात किती यशस्वी झाला आहे याची कल्पना येते आणि त्याचा सार्थ अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय दिव्यांग ऑलिम्पिक समितीने २२ उन्हाळी आणि ६ हिवाळी दिव्यांग खेळांना मान्यता दिली आहे. बॅडमिंटन आणि तेक्वान्डो हे त्यातील सर्वात अलीकडे सामील झालेले खेळ आहेत.

या प्रदर्शनात वारंवार आढळणारे आणि अतिशय महत्त्वाचे असे कोणते वाक्य असेल तर ते “अपंग नाही तर दिव्यांग आहोत” हे आहे. २०१२च्या स्पर्धांपासून या वाक्याने अशा स्पर्धांना नवी ऊर्जा मिळाली आहे. सामान्य खेळाडूंच्या स्पर्धा चित्तथरारक असतातच, परंतु दिव्यांग खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये एका आगळ्यावेगळ्या आणि दमदार मानसिक ताकदीची ओळख होते आणि ती मन भरून टाकणारी असते. आजच्या घटकेला १७० देशांचा सहभाग या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धांना मिळाला आहे हे जेवढे लक्षणीय आहे तितकेच यात भाग घेणारे या देशांचे ४ हजार ४०० खेळाडू…

Continue reading

दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंबरोबरच कोचनाही दिले जाते पदक

या वर्षीच्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धा बघत असताना एक बाब लक्षात आली की जेथे पदके दिली जात होती त्या जागी काही स्पर्धांमध्ये तीन व्यासपीठे निर्माण केली गेली होती. तेथे गर्दी थोडी अधिक होती. सहसा ऑलिम्पिक स्पर्धेत असे होत नाही. येथे...

दिव्यांग स्पर्धक होणे असते प्रचंड खर्चाचे!

पूर्वीच्या काळात दिव्यांग म्हणून कुटुंबात जन्म घेणे हे केवळ आई-वडीलच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी एक मानसिक दिव्य असायचे आणि ते पार पाडताना मनाची होणारी घालमेल आणि काही इतरांचे दृष्टीक्षेप मनाला अधिक कोवळेपण देत असतात. दिव्यांग फार लहान असताना त्याला...

पाहा काट्याविना गुलाब आणि करा म्हणीतही बदल

गुलाबाला काटे असतातच.. या म्हणीचा पुनर्विचार करण्याची वेळ आता आली आहे. गुलाबाचे फुले सर्वांनाच खूप आवडते. परंतु गुलाबाला काटे नसते तर ती फुले आपल्याला तितकीच आवडली असती का? असा प्रश्न साहजिकच मनात येऊन जातो. याचे उत्तर न देता वनस्पतीवर...
error: Content is protected !!
Skip to content