Tuesday, September 17, 2024
Homeडेली पल्सकोणत्याही काळात मनोबल...

कोणत्याही काळात मनोबल वाढविण्यासाठी.. (भाग-अंतीम)

सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोणत्याही काळात मनोबल वाढविण्यासाठी हा खास लेख..

ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सद्गुरु श्री वामनराव पै यांनी–

“हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,

सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.

सर्वाचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर

आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.”

अशी अत्यंत सोपी व अर्थपूर्ण प्रार्थना रचली, नव्हे ती त्यांना सहजतेने स्फुरली. लहानातील लहान मुलाला व विद्वानातील विद्वान व्यक्तीलादेखील समजेल अशी विश्वप्रार्थना सतत मुखात ठेवल्याने शुभचिंतनाद्वारा व्यक्तीचे व विश्वाचे कल्याण नकळत व विनासायास साधले जाते.

शंभर टक्के सकारात्मक

‘माम्नुस्मरं युद्धच’ म्हणजे माझ्या स्मरणात युद्ध कर असा दिव्य संदेश भगवंतांनी अर्जुनाला देऊन अर्जुनाची निक्रियता व संभ्रमावस्था दूर केली. जसे स्मरण तसे जीवन हे लक्षात ठेवून कोणत्या गोष्टी स्मरणाच्या कप्प्यात जपून ठेवायच्या व कोणत्या गोष्टी विस्मरणाच्या कप्प्यात कायमच्या फेकून द्यायच्या याचे भान ठेवले म्हणजे सुखसमाधानाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. शब्द केवळ वायुरूप नसतात. शब्दांच्या निमित्ताने जीवनातील अनेक प्रसंगाची व घटनांची उजळणी होत असते.

उदाहरणार्थ ‘घर’ शब्द उचारला की आपण ज्या घरात अनेक वर्षे राहिलो त्या घराचे चित्र क्षणार्धात डोळ्यांसमोर उभे राहते. म्हणूनच कोणत्याही शब्दाचा उच्चार करण्यापूर्वी तो शब्द, तो विचार शुभ सकारात्मक विश्वासक व होकारार्थी असेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. वारंवार म्हटली जाणारी प्रार्थना अंतर्मनान मूळ धरून कालांतराने परिस्थितीरूपाने साकार होणार असल्याने प्रार्थनेतील शब्दरचना शुद्ध शुभचिंतन निर्माण करणारी असावी. जीवनविद्येच्या विश्वप्रार्थनेत कोणताही नकारार्थी शब्द, नकारात्मक विचार नसल्याने ती शंभर टक्के सकारात्मक आहे आणि म्हणूनच निसर्गनियमांशी सुसंगत आहे. निसर्गनियमांशी सुसंगत जीवन  जगण्याची परिणती सुख, शांती, समाधान यात होणार हे निसर्गनियमांइतकेच निश्चित!

मनोबल

आत्मश्रद्धेचे बळ आणि फळ

‘अदृश्यावर विश्वास म्हणजेच श्रद्धा आणि ज्यावर तुमचा विश्वास तेच दृश्यात पाहणे हेच श्रद्धेचे फलित.’ (Faith is to believe what you do not see and the reward of faith is to see what you believe.) असा इंग्रजीत एक सुंदर सुविचार आहे. विश्वप्रार्थनेमुळे शुभचिंतनाचे विचार स्पंदनाच्या रूपाने विश्वात सर्वत्र पसरत असल्याने आपण ज्या-ज्या व्यक्तींच्या संपर्कात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष येत असतो त्यांच्याकडूनही आपल्याबद्दल शुभचिंतन केले जाते. क्रिया तशी प्रतिक्रिया या न्यायाने आपल्याशी संबंध येणार्‍या व्यक्‍ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागतात असे अनुभवास येते. साहजिकच आपली कामे आपल्या मर्जीनुसार होत जातात. परिणामी आपली सकारात्मक द्ष्टी बळावते व आपला आत्मविश्वास वाढतो.

डॉ. आंबेडकर म्हणायचे, “माझ्यातील प्रचंड आत्मविश्वासामुळेच मी, घडलो.” प्रचंड आत्मविश्वास सहजगत्या निर्माण होतो. आत्मश्रद्धा ही अंधश्रद्धा ब डोळस श्रद्धा ह्यापासून वेगळी आहे. अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा ह्या श्रद्धेच्या दोन प्रकारात श्रद्धा ठेवली जाते. अन्य कोणावर तरी किंवा अन्य कशावर तरी परंतु आत्मश्रद्धेच्या प्रकारात मात्र आपणच आपल्यावर श्रद्धा ठेवायची असते. आत्मश्रद्धा या श्रद्धेच्या प्रकारात बहिर्मनाची पूर्ण श्रद्धा अंतर्मनावर असणे आवश्यक असते.

बहिर्मनाची जर अंतर्मनावर श्रद्धा नसेल तर अंतर्मन बहिर्मनाला साथ देणार नाही. यासाठी अंतर्मनाच्या प्रचंड अमर्याद शक्तीचे (infinite intelligence) वास्तव ज्ञान असणे आवश्यक आहे. आत्मश्रद्धेची जोपासना करावयाची म्हणजे प्रत्यक्षात अंतर्मन व बहिर्मन या दोन मनांचे भावनिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे होय. हे भावनिक ऐक्य साधण्याचा सोपा उपाय म्हणजे शुभचिंतनाद्वारे बहिर्मनाचे शुद्धीकरण करून अंतर्मनाचे उन्नयन करणे आणि या सर्वांवर सहज सोपा उपाय म्हणजेच विश्वप्रार्थना!

मनोबल

हल्ली कोरोनाग्रस्त वातावरणात बहुतेक सर्वजण कोरोनाशिवाय दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलतच नाहीत असे दिसून येते. “जसा विचार तसा जीवनाला आकार” असं सद्गुरू श्री  वामनराव पै म्हणतात. निराशाजनक विचारांचे सातत्य व तीव्रता लक्षात घेता असे विचार  अंतर्मनात जाण्याची दाट शक्यता असते. एकदा का एखादा विचार अंतर्मनात गेला की अंतर्मन आकाशपाताळ एक करून तो विचार परिस्थिती रूपाने जीवनात कसा साकार होईल यासाठीच काम करते. (Once your sub-conscious mind accepts an idea, it will move heaven and earth to bring it to pass.” आपल्याला नकारार्थी विचार करण्याची  सवय जडल्याने आणि ते टाळणे जमत नसल्याने आपण काळजी घेण्याच्या नावाखाली काळजी करत बसतो. विचारांचा करा विचार, तुम्ही विचारांचा विचार नाही केलात तरी विचार तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाहीत..

सद्गुरू श्री वामनराव पै म्हणायचे, First there was a thought & the thought was GOD.

सुंदर, मांगल्यपूर्ण विचारानी भारलेली ही विश्वप्रार्थना दिवसभरात रिकामपणी सतत म्हणावी तसेच रात्री झोपण्यापूर्वी किमान १०८ वेळा म्हणावी. ह्या विश्वप्रार्थनेसाठी कोणतेही कष्ट नाहीत, काहीही खर्च नाही व वेळेचा अपव्यय नाही. सर्वांच्या कल्याणासाठी म्हटलेल्या या विश्वप्रार्थनेत आपण स्वत:ही सहभागी असल्याने ह्या विश्वप्रार्थनेचे फळ सर्वप्रथम मिळते ते प्रार्थना म्हणणाऱ्याला.

बऱ्याच वेळा आपण सदगुरुंची कृपा व्हावी अशी अपेक्षा करतो. सदगुरू श्री वामनराव पै म्हणतात, ”कृपा म्हणजे कर आणि पाहा.” म्हणजेच मनापासून प्रार्थना म्हणा आणि त्याचबरोबर तुमच्या वाट्याला आलेले काम हसतखेळत व प्रामाणिकपणे करा. मनापासून उत्कृष्ट काम करण्यातून मिळणारा आनंद आगळाच आणि विश्वप्रार्थना म्हटल्याने मिळणारे सुखसमाधान अगदी आगळेवेगळेच!

Continue reading

व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व  भगवद्गीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे  म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दांत म्हणायचे तर गुरुपौर्णिमा  म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरु. प्रथम गुरु. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आईवडिलांनी एखादी गोष्ट मला करायला सांगितली पण  माझ्या गुरुंनी करू नकोस असे सांगितले तर ती गोष्ट मी करणार नाही....

गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व भगवद्गीता महाभारतात आहे. महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आई-वडिलांनी एखादी गोष्ट मला करायला सांगितली पण माझ्या...

गुरुपौर्णिमा, अर्थात कृतज्ञता दिन!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद,  अठरा पुराणे व भगवदगीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वांना परिचित आहेत. आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरू महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यासजयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आईवडिलांनी एखादी  गोष्ट मला करायला सांगितली, पण माझ्या गुरुंनी करू नकोस असे सांगितले तर ती गोष्ट मी करणार नाही. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट मला...
error: Content is protected !!
Skip to content