Homeन्यूज अँड व्ह्यूजआई-बाबा आणि मुलांमधला...

आई-बाबा आणि मुलांमधला संवाद संपत चाललाय का?

समाज एकसारखा राहत नाही. त्यात बदल होत असतो आणि हा बदल अनेकदा त्यावेळी पालक असलेल्या लोकांच्या लक्षात येतो तेव्हा ते सर्वात अगोदर कुणाची काळजी करीत असतील तर आपल्या मुलांची. हे तर जागतिक सत्य म्हणावे लागेल. आज जरी आई आणि वडील हे दोघेही नोकरीला जाणारे असतील तरीही त्यांच्या मनातल्या एका महत्त्वाच्या कोपऱ्यात आपली मुले आणि त्यांचा भविष्यकाळ हा विचार कायम सुरु असतोच. घरातील आई, वडील आणि मुले यांचा संवाद संपत चालला आहे असे जरी म्हटले गेले असले आणि त्यात काहीसे तथ्य असले तरीही पालकाना मुलांच्या भविष्यकाळाची काळजी असते हे नक्की…

पालक ज्या पद्धतीने जगाकडे बघत असतात त्यातून त्यांना जगातील एकूण परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे असे स्पष्ट दिसते. त्यामधून ते भविष्यकाळाचे काही अंदाज बांधीत असतात. आणि याचवेळी अशा बदलत्या परिस्थितीत आपल्या मुलांचा भविष्यकाळ कसा जाणार याबद्दल ते साशंक होतात. आज जगातल्या बहुतेक सर्व देशांमध्ये जवळजवळ सगळ्या सोयी उपलब्ध असल्यामुळे अतिप्रगत असा भाग आज उरलेला नाही. त्यामुळे पालक, मुले आणि भविष्यकाळ या विषयावर अमेरिकेतील एका संस्थेने संशोधन केले. यातील माहितीचा नमुना जरी लहान म्हणजे केवळ २ हजार पालक असा असला तरी त्याचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत असे म्हणावे लागेल.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे असे संशोधन आणि त्यातील निष्कर्ष यामुळे पालक आणि मुले यांच्यात अधिक विश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शाकेल आणि ते येत्या काळातील काही घटना विकोपाला जाणार नाहीत अशी खबरदारी घेऊ शकतील. या पालकांची एक मोठी काळजी पृथ्वीच्या हवामानाचे काय होणार याची आहे. त्याबद्दल वैयक्तिक रीतीने आपण काही करू शकत नाही ही खंत आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान आणि सोबत येणारी पर्यावरणाची हानी निश्चितच काळजी करायला लावणारे प्रश्न आहेत. त्यानंतरची काळजी सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यकाळातील आपल्या मुलांच्या नोकरीमध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतील आणि त्यावर आज काही उपाय योजणे शक्य आहे का? हीदेखील आहे.

आज ‘जंक फूड’ने व्यापलेले जग न्याहाळताना आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम बघताना भविष्यकाळात आपल्या मुलांना आणि त्यानंतरच्या पिढीला निदान पोषक आहार तरी मिळणार की नाही हीदेखील आणखी एक काळजी आहे. संपूर्ण समाजच बदलत असल्याने त्यासोबत इतर जे काही बदलेल ते समजावून घेण्याची वृत्ती आणि त्यानुसार कृती यासाठी मुलांना सावध करावे लागेल. पालकांनी त्यासाठी तयारीही सुरु केली आहे. अन्नाची, पाण्याची आणि वस्तूंची नासाडी करू नये किंवा अशा चांगल्या सवयी घरातच लागू शकतात असे यातील अनेक पालकांचे म्हणणे आहे. आवश्यक त्या आणि तेवढ्याच वस्तूंचा वापर करीत आपल्या गरजा शक्य तितक्या कमी करू शकणे गरजेचे आहे असे हे पालक आपल्या मुलांना सांगू इच्छितात. या संशोधनात सहभाग असणाऱ्या बहुतांश पालकांना आपल्या मुलांविषयी पूर्ण खात्री दिसून आली. त्यातच या संशोधनातून त्यांना नेमका अर्थ शोधावा लागेल…

Continue reading

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...

आता होणार खग्रास सूर्यग्रहणही कृत्रिम!

काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे. “सूर्यग्रहणाची वाट कशाला बघायची? आम्ही विज्ञानाची करामत करून केवळ दोन उपग्रह अवकाशात सोडणार आणि सूर्यग्रहण होईल......
Skip to content