Thursday, November 21, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजऑलिम्पियामध्ये झाल्या प्राचीन...

ऑलिम्पियामध्ये झाल्या प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धा!

ग्रीस या देशाची प्रेरणा, कल्पना आणि निर्मिती असलेल्या प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धा ग्रीसच्या ऑलिम्पिया या शहरात संपन्न झाल्या होत्या. त्या इसवीसनापूर्वीच्या ८व्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत घेतल्या गेल्या. त्यानंतर इसवीसन १८९६मध्ये आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. त्याची आणि पर्यायाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना पिअरे द कुबर्टीन यांनी इसवीसन १८९४मध्ये केली आणि इसवीसन १८९६मध्ये अथेन्स या शहरात प्रथम आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्या गेल्या. 

आतापर्यंत जगात ३२ उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या असून त्या एकूण २१ शहरांमध्ये घेतल्या गेल्या आहेत. याशिवाय २४ हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धादेखील २४ शहरांमध्ये आयोजित केल्या गेल्या. एकूण २०६ देश आणि जवळपास ११,००० खेळाडू या स्पर्धांमध्ये भाग घेतात. खेळ अनेक असले तरी प्रत्येक खेळात प्रचंड सराव, चपळता आणि निश्चल मन असल्याशिवाय येथे कामगिरी करणे आणि सर्वोत्कृष्ट कामगिरीतून पदक प्राप्त करणे कठीण असते हे आलेच.

ऑलिम्पिक स्पर्धा संपूर्ण मानवजातीला एकत्र करणाऱ्या, जागतिक शांततेचा पुरस्कार करणाऱ्या आणि खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीमधून आशेची प्रेरणा देणारे आहेत ही बाब निर्विवाद आहे. एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या स्पर्धा असतात हेही मान्य… पण… पण जगात सर्वदूर संघर्ष आणि युद्धाचे वातावरण असताना आणि जिकडेतिकडे अनाचार आणि हिंसाचार यांचेच वर्चस्व दिसत असताना, अनेक भागात लोकांचे अश्रू थांबताना दिसत नाहीत, अशावेळी आपण सर्वांनी खेळ आणि खेळाडू यांच्यासाठी इतकी काळजी करण्याची गरज आहे का? असा एकवेळाच का होईना पण प्रश्न विचारला जाणे नवीन नाही. ते या स्पर्धांच्या पाचवीलाच पुजले आहे, असे म्हणता येईल. आणि अशा वातावरणातदेखील आज ऑलिम्पिक स्पर्धा आणि त्यांची मशाल खंबीरपणे उभी आहे.

ऑलिम्पिक

प्रचंड शारीरिक आणि मानसिक मशागत यांच्यामधून कमावलेली आशेची एक ज्योत अशी ही मशाल आहे. एकमेकांशी भांडणारे देश आणि तेथील खेळाडू येथे सुकोप स्पर्धा करतात आणि विजयाचा आनंद आपल्या देशासाठी घेऊन जातात. ही तर बाब विजयाची झाली. परंतु या जागतिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करण्याइतकीच येथे अव्वल क्रमांकात आपली कामगिरी दाखल करणे महत्त्वाची बाब असते.

ऑलिम्पिक स्पर्धा भाषेची बंधने तोडतातच. त्याशिवाय जगभरातील टेलिव्हिजनवर बघणारे आणि रेडिओवरून समालोचन ऐकणारे अब्जावधी प्रेक्षक, श्रोते कोणत्याही देशाच्या विजयी खेळाडूला सलामी देण्यासाठी तत्पर असतात. आजच्या टेबल टेनिसला पूर्वी पिंग पाँग म्हटले जायचे. त्या काळात अमेरिका आणि जपानमध्ये संबंध बिघडले होते त्याची यावेळी आठवण होते.

नाविन्य हादेखील ऑलिम्पिक खेळ स्पर्धांचा प्राण आहे. जेथे हे खेळ संपन्न होतात ती शहरे आमूलाग्र बदलतात. तेथे नवीन सांस्कृतिक खुणा निर्माण होतात. व्यापार वाढतो. आणखी एक बाब बघायला मिळते ती अशी की, प्रत्येक देशात या खेळापूर्वी दोन तीन वर्षे तरुणाईला जाग येते आणि शरीरसौष्ठ्वाकडे अधिक लक्ष दिले जाते. हेही एक चांगल्या आरोग्याचे लक्षण आहेच. एकूण काय तर जगात ऑलिम्पिक स्पर्धा महानच असतील. 

Continue reading

एआय गप्पिष्ट आणि एकाकीपणा..

एकाकीपणा काय असतो हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळते असे मानले जाते. मानसशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक हे दोघेही शारीरिक आणि मानसिक अशा वेगवेगळ्या प्रकारांनी एकाकीपणाकडे बघतात असे दिसते. एकाकीपणा घालवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग असतो तो संवादाचा. पण संवादाला किमान दोन...

दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये असते सुरक्षिततेला महत्त्व

सुरक्षित असतील तर कोणतेही खेळ प्रकार आणि त्यांच्या अगदी जागतिक स्तरावरील स्पर्धासुद्धा नावाजल्या जातील. पण दिव्यांग ऑलिम्पिकमधील सुरक्षितता ही काही वेगळ्या अंगाने बघावी लागेल. कारण येथे शरीर अगोदरच एका भयानक संकटातून पार झाले असते आणि जीवन पुन्हा सुरु करीत...

एक चित्र हजार शब्दांचे… 

एक चित्र जे सांगू शकेल ते हजार शब्दही व्यवस्थित सांगू शकणार नाहीत, अशी एक चिनी म्हण आहे आणि ती अनेकदा आपल्या प्रत्ययालासुद्धा येत असते. जे ऐकले त्याचा जेवढा परिणाम होत नाही तितका परिणाम तेच पाहिले तर अधिक होतो हेही...
Skip to content