# Kiran Hegde Live > Unique News ## Posts - [हे आहे इंटरनेटवरच्या '४०४ एरर'मागचे गुपित!](https://kiranhegdelive.com/this-is-the-secret-behind-the-404-error-on-the-internet-explain-vikrant-patil/): आज ‘४०४ डे’. इंटरनेटवर एखादी लिंक उघडल्यावर जेव्हा स्क्रीनवर ‘४०४ एरर: पेज नॉट फाऊंड’ असा तांत्रिक संदेश दिसतो, तेव्हा तो केवळ तुटलेल्या लिंकचा संकेत नसतो. डिजिटल हक्कांच्या परिभाषेत, ४०४ हा कोड आता ‘डिजिटल मौना’चे आणि माहिती लपवण्याच्या प्रवृत्तीचे प्रतीक बनला आहे. ‘४०४ डे’ हा दिवस जगभरात माहितीच्या मुक्त प्रवाहावर लादल्या जाणाऱ्या बंधनांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी साजरा केला जातो. भारतात ज्या वेगाने ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न विस्तारत आहे, त्याच वेगाने इंटरनेट सेन्सॉरशिप आणि वेबसाइट ब्लॉकिंगचे जाळेही घट्ट होत आहे. हा केवळ तांत्रिक प्रश्न नसून, लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहिती मिळवण्याच्या मूलभूत अधिकारावर झालेला घाला आहे. एक धोरण विश्लेषक म्हणून, या तांत्रिक अडथळ्यांमागील कायदेशीर […] - [बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?](https://kiranhegdelive.com/will-ajitdadas-successor-in-baramati-not-be-unopposed/): राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक ‘बिनविरोध’ करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. पक्षश्रेष्ठींकडून या दोन्ही मतदारसंघांसाठी हिरवा कंदील मिळाल्याने महाविकास आघाडीतील (एमव्हीए) अंतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी बारामतीतून निवडला जाणारा अजितदादांचा उत्तराधिकारी बिनविरोध असण्याची शक्यता कमी आहे. भाजपचे आवाहन आणि मविआतील मतभेद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत ही निवडणूक ‘भावनिक’ आणि ‘बिनविरोध’ व्हावी, […] - [डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर 'मनाचे श्लोक'चा प्रभाव?](https://kiranhegdelive.com/is-dr-babasaheb-ambedkar-influenced-by-manache-shlok/): मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे ‘मनाचे श्लोक’ म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे. मात्र, यामुळे राजकीय पटलावर तीव्र चर्चा आणि विरोध सुरू झाला आहे. ९ एप्रिलला होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रस्तावामागची मुख्य कारणे काय? किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले की, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांवर मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. ‘मनाचे श्लोक’ केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत, तर ते आत्मपरीक्षण, सकारात्मक विचारसरणी आणि तणाव […] - [विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!](https://kiranhegdelive.com/air-travel-becomes-expensive-agriculture-sector-also-affected-exports-will-decline/): पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या वाढले आहेत. डोमेस्टिक प्रवास 2,000 रुपयांपर्यंत महाग देशांतर्गत विमान प्रवासासाठी प्रवाशांना आता सरासरी ₹ 1,800 ते ₹ 2,300 अधिक मोजावे लागत आहेत. मुंबई-दिल्ली, पुणे-बेंगळुरू, हैदराबाद-कोलकाता अशा प्रमुख मार्गांवर दरात झपाट्याने वाढ झाली आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात वाढलेल्या मागणीमुळे दर अधिकच चढले आहेत. यामुळे मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी विमानप्रवास आता पुन्हा एकदा “महागडा पर्याय” ठरू लागला आहे. आंतरराष्ट्रीय तिकिटांत मोठी उडी परदेशी प्रवासावर तर […] - [कारखाने पडताहेत बंद, सलग दुसऱ्या वर्षी होणार साखरेचा तुटवडा](https://kiranhegdelive.com/factories-are-closing-down-there-will-be-a-sugar-shortage-for-the-second-consecutive-year/): देशातील साखर उद्योगासमोर यंदाही मोठे आव्हान उभे राहिले असून भारतात सलग दुसऱ्या वर्षी साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील कारखाने अपेक्षेपेक्षा लवकर बंद पडत असल्याने उत्पादन घटले असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेवर आणि ग्राहकांवर होण्याची चिन्हे आहेत. उत्पादन कमी; मागणीपेक्षा पुरवठा अपुरा 2025-26 हंगामात भारताचे साखर उत्पादन 28 दशलक्ष टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता नाही, तर देशांतर्गत मागणी 28.5 ते 29 दशलक्ष टनांदरम्यान आहे. हंगामाच्या सुरुवातीला उत्पादनाचा अंदाज सुमारे 31 दशलक्ष टन होता; मात्र प्रत्यक्षात उत्पादनात मोठी घट झाली आहे. कारखाने लवकर बंद होण्यामागील कारणे या तुटवड्याचे मुख्य कारण म्हणजे उसाचे कमी उत्पादन. यामुळे […] - [उद्यापासून अवकाळी पावसाचा जोर ओसरणार!](https://kiranhegdelive.com/the-intensity-of-unseasonal-rains-will-subside-from-tomorrow/): आयएमडी च्या पुणे आणि नागपूर विभागाने स्वतंत्रपणे वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापासून पुढच्या पाच दिवसांत अवकाळी पावसाचा जोर ओसरणार आहे. पुढील 5 दिवसांचा (4 एप्रिल – 8 एप्रिल) अंदाज पुढीलप्रमाणेः 4 एप्रिल: पावसाचा जोर हळूहळू ओसरण्यास सुरुवात होईल, मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पाऊस सुरूच राहील. 5 आणि 6 एप्रिल: विदर्भात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे व्हायला सुरुवात होईल. 7 आणि 8 एप्रिल: राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तापमानात पुन्हा 2-3 अंशांनी वाढ होऊ शकते. हवामान इशारा: महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना पावसाचा तडाखा; ‘गारपिटी’सह वादळी वाऱ्याचे अनुमान आज 3 एप्रिलला महाराष्ट्रातील बहुतांश […] - [पालीतला तो एसटी बसस्टँड आणि फाजील अपेक्षा!](https://kiranhegdelive.com/that-st-bus-stand-in-pali-and-the-high-expectations/): एसटी प्रवास हा माझ्या आवडीचा विषय. विशेषतः लाल परी अधिक चांगली. दाणकन आपटल्याशिवाय दरवाजा लागत नाही. अचानक दरवाजा उघडण्याची भीतीदेखील कमी असते. आता लाल परीच्या जागी आरामदायी बस आल्या आहेत. हा एक बदल आहेच. मला मोटारीने प्रवास करणे आवडत नाही असे नाही, पण बसची मजा वेगळीच.माझ्या कोकणातील गावात पूर्वी कधीतरी बस येत असे. आम्हाला दोन किलोमीटर अंतरावर जावे लागत असे. आता गावात पूल झाला आणि आमच्या जुन्या घरासमोरील रस्त्यावरुन दिवसभरात बसच्या किमान तीस फे-या होतात. पाली या गावातील बसस्टंँडचे मला पहिल्यापासून आकर्षण आहे. याचे कारण हे गाव मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई येथून येणाऱ्या सगळ्या गाड्या पालीत येतात. कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यादेखील […] - [न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!](https://kiranhegdelive.com/courts-are-running-by-human-not-ai/): “न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही,” अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका ‘प्रथम अपिलावर’ प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा आणि प्रलंबित खटल्यांचा डोंगर लक्षात घेता, अशा प्रकारे ‘क्यू जंपिंग’ (रांग तोडून पुढे येणे) स्वीकारार्ह नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. संबंधित वकिलांनी आपल्या पक्षकाराच्या २०२१मधील अपिलावर तातडीने सुनावणी घेण्याचा आग्रह धरला होता. यावर न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदवत विचारले की, “जर आम्ही २०२१च्या प्रकरणाला प्राधान्य दिले, तर १९९० […] - [आसाममध्ये होणार भाजपाची हॅटट्रीक?](https://kiranhegdelive.com/will-bjp-win-a-hat-trick-in-assam-asks-dr-sukrit-khandekar/):  इशान्येकडील राज्यात आसाममधील सत्तासंघर्ष  नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. आसामध्ये येत्या नऊ एप्रिल या एकाच दिवशी १२६ जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत असून भाजपाविरूद्ध काँग्रेस अशी अटतटीची लढत बघायला मिळेल असे वातावरण आहे.  हिंदु-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणातून भाजपा पुन्हा एकदा सत्ता संपादन करील का? या प्रश्नांभोवती निवडणूक लढवली जात आहे. राज्यात २ कोटी ४९ लाख मतदार आहेत. मतमोजणी ४ मे रोजी आहे. सन २०१४मध्ये नरेंद्र मोदी या दिग्गज नेत्याचा देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय झाल्यापासून आसाममधील आसाममध्येही भाजपाला अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागले. देशातील अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा आसाममध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव मोठा असुनही हिंदू व्होटबँक आपल्या पठिशी एकत्रित उभी करण्यात भाजपाला मोठे यश लाभले. […] - ['जेईई ॲडव्हान्स्ड' परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!](https://kiranhegdelive.com/jee-advanced-exam-on-may-17-registration-from-april-23/): देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘जेईई ॲडव्हान्स्ड २०२६’ ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदाच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांवर आधारित बहुपर्यायी आणि संख्यात्मक प्रश्न विचारले जातील, जे विद्यार्थ्यांच्या वैचारिक आकलनाची आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेची चाचणी घेतील. दोन अनिवार्य पेपर ही परीक्षा संगणक आधारित (सीबीटी) असेल. परीक्षेत दोन अनिवार्य पेपर असतील: नोंदणी प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखाजेईई मेन २०२६मध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळ https://jeeadv.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. महत्त्वाचे टप्पे […] - [येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!](https://kiranhegdelive.com/next-saturday-or-sunday-walk-around-kaulu-with-your-feet-shackled/): भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि इतर सर्वच क्रांतिकारकांना बैलाच्या जागी कोलूला जुंपले जात असे आणि आठ तासांत तीस पाऊंड म्हणजे साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेलाचे प्रमाण पूर्ण न झाल्यास न थांबता कोलू फिरवावा लागे आणि अमानुष शिक्षाही केल्या जात. या अघोरी छळाला कंटाळून इंदुभूषण राय यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आत्महत्त्या केल्या. उल्हासकर […] - [आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! ](https://kiranhegdelive.com/today-is-hanuman-jayanti-know-the-ritual-to-worship-of-maruti/): आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा एक देव म्हणजे ‘मारुती’! मारुती हा सर्वशक्तिमान, महापराक्रमी, महाधैर्यवान, सर्वोत्कृष्ट भक्त व संगीतज्ञानमहंता म्हणूनही प्रसिद्ध आहे. जीवनाला परिपूर्ण करणारे जे जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे मारुती. शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन राहणार्‍या मारुतीच्या जन्माचा इतिहास, हनुमान जयंती पूजाविधी आणि मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया. हनुमान जयंतीला अन्य दिवसांच्या तुलनेत […] - [गडकरींनी राबवले! मोदींनी रेटले!!](https://kiranhegdelive.com/gadkari-implemented-and-modi-pushed-it-says-aniket-joshi/): आखाती देशात युद्ध पेटल्यापासून जगाची चिंता वाढली आहे. गॅस आणि पेट्रोल, डीझेल यांची टंचाई केवळ भारतातच नाही तर युद्ध पेटवणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांनाही जाणवू लागलेली आहे. अमेरिकन पंप तसे कोरडे वगैरे पडलेले नाहीत, पण तिथेही डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले आहेतच. भारतात तर गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्याची दृष्ये आपण पाहातो आहोत. नोटबंदीनंतर बँकांपुढे लागलेल्या रांगा, कोराना महासाथीवेळी झालेली टंचाई, अडचणी… अशा साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. सरकार आपल्या परीने राजनैतिक आणि व्यापारी धोरणांचा वापर करत राहिले. होर्मूझच्या सामुद्रधुनीत अडकून पडलेली भारतीय तेल व गॅसवाहू जहाजे सर्वात आधी बाहेर पडली हा भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचाच भाग होता हे नक्की. दिल्लीतील इराणी दूतावासात भारताचे परराष्ट्र सचिव […] - [रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा ](https://kiranhegdelive.com/enjoy-bharti-prataps-singing-on-sunday/): मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भारती प्रताप यांना तबल्यावर यति भागवत तर संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे साथ देतील. कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. अधिक माहितीसाठी संपर्क- ७७००९९४४९५  - [आजपासून 'क्रेडिट स्कोअर' होणार दर आठवड्याला अपडेट!](https://kiranhegdelive.com/from-today-credit-score-will-be-updated-every-week/): बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी’ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर आणि सिबिल स्कोअरवर होणार आहे. नव्या नियमातील ५ महत्त्वाचे बदल तज्ज्ञांचे मत काय? आर्थिक तज्ज्ञांच्या मते, हा बदल बँकिंग प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा आहे. “आतापर्यंत क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी ४५ ते ६० दिवस लागत होते. मात्र, नवीन नियमांमुळे ग्राहकाची सध्याची आर्थिक स्थिती बँकांना अचूक समजेल. याचा फायदा चांगल्या क्रेडिट हिस्ट्री असलेल्या ग्राहकांना तातडीने कर्ज मिळण्यासाठी होईल.” ग्राहकांसाठी सल्ला - [आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले](https://kiranhegdelive.com/iran-to-attack-18-companies-in-the-gulf-including-google-apple-from-today/): इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित प्रमाणात मदत देऊ केली आहे. अनेक देशांनी तर अमेरिकेला त्यांचे हवाईक्षेत्र वापरण्यासही अनुमती नाकारली आहे. दरम्यान, इराणनेही अमेरिकेच्या अत्यंत तीव्र हल्ल्याला सामोरे जातानाच आखाती देशांतल्या अमेरिकेच्या १८ मोठमोठ्या कंपन्यांवर आज रात्री १० वाजल्यापासून हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. यात आयबीएम, एप्पल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेस्ला, इंटेल आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांनी कंपन्यांच्या एक किलोमीटर परिघापासून लांब राहवे, असे आवनाहनही इराणने […] - [बंगालमध्ये राजकीय 'ग्रँड स्लॅम'! लिएंडर पेसला भाजपमध्ये 'स्पेस'!!](https://kiranhegdelive.com/political-grand-slam-in-bengal-paes-gets-space-in-bjp/): भारताचा दिग्गज टेनिसपटू आणि ‘कोलकाता बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिएंडर पेस याने मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राजकीय खळबळ उडवली. बंगाली माध्यमांच्या मते, २०२१मध्ये गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश करणाऱ्या पेसने आता ‘घासफूल’ सोडून ‘कमळ’ हाती घेतल्याने बंगालच्या राजकारणात मोठे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेसचा भाजप प्रवेश हा ममता बॅनर्जींसाठी वैयक्तिक धक्का मानला जात आहे. पेस केवळ जागतिक कीर्तीचा खेळाडू नसून कोलकातामधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. त्याचे वडील डॉ. वेस पेस हेदेखील बंगालच्या क्रीडा क्षेत्रातील मोठे नाव आहेत. त्यामुळे शहरी आणि उच्चभ्रू मतदारांमध्ये पेसचा प्रभाव भाजपसाठी फायदेशीर ठरू […] - [केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारसाठी मोदी प्रयत्नशील!](https://kiranhegdelive.com/modi-wants-left-front-government-in-kerala-says-rahul-gandhi/): केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा यावे असे वाटते, असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला. ‘भाजप-एलडीएफ’मध्ये गुप्त समझोता? कन्नूर येथील रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “केरळमध्ये काँग्रेसप्रणित ‘यूडीएफ’ला रोखण्यासाठी भाजप आणि एलडीएफमध्ये एक ‘छुपी भागीदारी’ झाली आहे. पंतप्रधान मोदी देशात इतरत्र धर्माच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलतात, मात्र केरळमधील शबरीमला सोने घोटाळ्यासारख्या प्रकरणांवर ते मौन बाळगून आहेत. याचे कारण त्यांना डावी आघाडी सत्तेत हवी […] - [नव्या बदलांसह 'दिवाळखोरी’ लोकसभेत मंजूर!](https://kiranhegdelive.com/bankruptcy-bill-passed-in-loksabha-with-new-changes/): लोकसभेने काल इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (संशोधन) विधेयक, २०२५ दुरुस्त्यांसह मंजूर केले. वित्त व कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या या विधेयकात १२ महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे विधेयक आता राज्यसभेकडे जाणार आहे, पण लोकसभेतील मंजुरीने दिवाळखोरी प्रक्रियेला वेग देण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे. राज्यसभेतही सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच बहुमत आहे. त्यामुळे तिथेही हे विधेयक मंजूर होण्यास काही अडचण निर्माण होणार नाही. मुख्य बदल काय आहेत? उद्योग क्षेत्रावर काय परिणाम? उद्योगांसाठी ही बातमी ‘रिलीफ’ आहे. सध्या हजारो कंपन्या दिवाळखोरी प्रक्रियेत अडकल्या आहेत. नव्या बदलांमुळे: विशेषज्ञांचे मत आहे की, हे बदल नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) कमी करतील आणि […] - [कडक उन्हाळ्यातही राहा एलिगंट!](https://kiranhegdelive.com/stay-elegant-even-in-the-hot-summer/): उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, पेहरावाची चिंता सगळ्यांनाच सतावते. विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या महिलांसाठी हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा असतो, कारण एकीकडे उष्णतेपासून आराम हवा, तर दुसरीकडे व्यावसायिक देखणेपणाही राखायचा असतो. या दोन्ही गरजा एकाचवेळी पूर्ण करणारा पर्याय म्हणजे प्युअर कॉटन आणि हॅण्डलूम साड्या. आज ऑफिसमध्ये साडी नेसणे हे ‘जुनाट’ राहिलेले नाही, उलट ते एक आत्मविश्वासपूर्ण, परिपक्व आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध फॅशन स्टेटमेंट बनले आहे. योग्य साडी निवडली, तर उन्हाळ्यातही तुम्ही दिवसभर फ्रेश, एलिगंट आणि कम्फर्टेबल राहू शकता. कॉटन साडी का?- विज्ञान आणि सौंदर्य कापूस हे नैसर्गिक तंतू असल्यामुळे ते उष्णतेत शरीराला श्वास घेऊ देते. घाम शोषून घेण्याची क्षमता, त्वचेला होणारी सौम्य स्पर्शसंवेदना […] - ['बीएमसी'त इतिहास घडविणाऱ्या 'मेट्रो वुमन'!](https://kiranhegdelive.com/metro-women-who-created-history-in-bmc/): बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या एका निर्णयाने त्या मुंबई महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या. इतिहासाचे एक नवे पान १८८८मध्ये मुंबई महानगरपालिका कायद्यांतर्गत बीएमसीची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक धुरंधर अधिकारी या पदावर आले आणि गेले. परंतु या यादीत एकाही महिलेचे नाव नव्हते. अश्विनी भिडे यांनी आज तो अपूर्ण इतिहास पूर्ण केला. हे केवळ एका अधिकाऱ्याच्या पदोन्नतीचे नाही, तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय वाटचालीत रुजत चाललेल्या […] - [नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना...](https://kiranhegdelive.com/welcoming-the-new-municipal-commissioner-says-vijaykumar-kale/): मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या ‘हौदा’कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रो, दोन्हीच्या त्या सध्या प्रमुख असल्यामुळे काम व जबाबदारी टाळण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखविण्याची संधी त्यांना साधता येणार नाही. त्यामुळे आता स्वतःच स्वतःकडे बोट दाखवावे आणि मुंबईतल्या या गिरगावकरांना पावसाळ्यातल्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्याचे काम तडीस न्यावे, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. गिरगांवच्या झावाबावाडी समोरील मोठा ‘हौद’ बुजवण्यासाठी मेट्रोला मोठा अपघात हवाय का? मुंबईतील भुयारी रेल्वे सुरु होऊन आता नक्कीच […] - [श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!](https://kiranhegdelive.com/shraddha-our-saburi-emergency-landing-of-a-flight-from-delhi-to-shirdi/): दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास आकाशात फिरवले. या काळात प्रवाशांमध्ये, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पायलटने हवामान सुधारण्याची वाट पाहत विमानाला चक्री मार्गाने फिरवले, पण शेवटी जोखीम न घेता सूरत एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि लँडिंगची परवानगी घेतली. विमान अचानक सूरतच्या दिशेने वळल्यावर प्रवाशांचा गोंधळ अधिक वाढला, मात्र विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने शांतता राखली आणि आवश्यक ती माहिती प्रवाशांना […] - [अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!](https://kiranhegdelive.com/ashwini-bhide-becomes-mumbai-municipal-corporations-first-woman-commissioner/): देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी ‘मेट्रो वुमन’ म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे. पुढील आदेश येईपर्यंत भिडे या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालकपदाचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. भिडे यांच्या नियुक्तीपूर्वी असीम गुप्ता, अनिल डिगीकर, मिलिंद म्हैसकर आणि संजय मुखर्जी यांच्या नावांचीही या पदासाठी चर्चा होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असीम गुप्ता यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि अखेर भिडे यांची निवड झाली. फडणवीस यांच्या […] - [राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा झाला भावूक!](https://kiranhegdelive.com/ravindra-jadeja-gets-emotional-during-the-match-against-rajasthan/): गुवाहाटीत काल संध्याकाळी खेळल्या गेलेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावर चाहत्यांचा प्रतिसाद पाहून रवींद्र जडेजा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, रवींद्र जडेजा खलील अहमदचे चुंबन घेत असलेला एक व्हिडिओही सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. आयपीएल २०२६साठी राजस्थान रॉयल्स (आरआर) संघात परतल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)विरुद्धच्या आपल्या पहिल्याच सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा अत्यंत भावूक झालेला दिसून आला. सीएसके सोबत १२-१३ वर्षे घालवल्यानंतर, त्या फ्रँचायझीचा निरोप घेणे त्याच्यासाठी कठीण होते; तरीही, त्याने आपल्याच जुन्या संघाविरुद्ध अप्रतिम कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले आणि १८ धावांत २ बळी (२/१८) अशी शानदार गोलंदाजी नोंदवली. चेन्नई सुपर किंग्ससोबत एक दशकाहून अधिक काळ घालवल्यानंतर झालेल्या भावनिक […] - [बिहारच्या नालंदात शीतलामाता मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू](https://kiranhegdelive.com/stampede-at-sheetlamata-temple-in-bihars-nalanda-9-devotees-dead/): बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ परिसरातील माता शीतला मंदिरात मंगळवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. यात किमान ९ भाविक ठार, तर इतर अनेक जखमी झाले आहेत. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने व महावीर जयंतीमुळे मंदिरात प्रचंड गर्दी जमली होती. बॅरिकेड्स तुटल्याने धावपळ उडाली. त्यामुळे भक्तांची झुंबड उडाली आणि त्याचे पर्यावसान चेंगराचेंगरीत झाले. जखमींना सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बिहार सरकारने मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. बिहार सरकारने पीडित कुटुंबांना आपत्कालीन निधीतून ₹ ४ लाख आणि मुख्यमंत्री मदत निधीतून ₹ २ लाख असे एकूण ₹ ६ लाख सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येक मृत […] - ['के-पॉप'चे पुनरागमन! एप्रिलपासून 'अरिरांग' आणि कॉन्सर्टचे तब्बल ८२ शो!](https://kiranhegdelive.com/k-pop-is-back-arirang-and-82-concert-shows-from-april/): जगप्रसिद्ध के-पॉप बँड बीटीएसचे सातही सदस्य- आरएम, जिन, सुगा, जे होप, जिमिन, व्ही आणि जंग कुक हे जवळपास चार वर्षांच्या खंडानंतर 21 मार्च रोजी सोलच्या ग्वानहवामुन चौकात एकत्र आले. त्यांनी ‘बीटीएस दी कमबॅक लाईव्ह अरिरांग’ या भव्य मोफत कॉन्सर्टने जगाला दणाणून सोडले. या एक तासाच्या कॉन्सर्टच्या एकच दिवस आधी प्रसिद्ध झालेला त्यांचा नवा अल्बम ‘अरिरांग’ पहिल्याच दिवशी तब्बल ४ कोटी (३.९८ मिलियन) प्रतींहून अधिक विकला गेला. चार वर्षांच्या गॅपनंतर एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ दरम्यान ३४ देशांमध्ये या बॅण्डचे ८२ शोज नियोजित असून प्रत्येक ठिकाणी ५०,०००पेक्षा अधिक प्रेक्षकांची क्षमता असेल. अरिरांग (ARIRANG) हे नाव कोरियाच्या शतकांपुरातन लोकगीतावरून घेतले असून ते […] - [विधिमंडळाच्या अधिवेशनाचे फलित- खचलेले विरोधक तर हतबल मित्रपक्ष!](https://kiranhegdelive.com/outcome-of-legislative-session-exhausted-opposition-and-desperate-allies-says-dr-sukrit-khandekar/): राज्याच्या पाच आठवडे चाललेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्यक्षात वीस दिवसच कामकाज झाले. अधिवेशनात विरोधी पक्षाकडून एकाही विषयावर सरकारला धारेवर धरले गेले नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यtच्या घटनेवर चर्चा घडवावी यासाठी विरोधी पक्षाने सभागृह दणाणून सोडले नाही. कलंकीत मंत्र्यांना सरकारमधून हटवा यासाठी विरोधी पक्षाने  हल्लाबोल केला नाही. सरकारला घाम फोडला असा एकही प्रसंग घडला नाही. अधिवेशात विरोधी पक्ष निष्प्रभ तर दुसरीकडे महायुती सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोन्ही पक्ष हतबल असल्याचे चित्र दिसले. विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या भाजपाच्या मित्रपक्षांचे प्रमुख अनुक्रमे एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री आहेत. […] - [जिथे विवेक गोठतो, तिथे तर्क थंड पडतो आणि उभा ठाकतो 'भोंदू'!](https://kiranhegdelive.com/where-conscience-freezes-logic-ends-and-hypocrite-arrive-says-gargi-sawant/): नाशिकमध्ये अशोक खरात या स्वयंघोषित ‘तांत्रिक’ व्यक्तीने अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे, त्यांची मानसिक-आर्थिक लूट केल्याचे प्रकरण उघडकीस आले तेव्हा पहिला प्रश्न अनेकांच्या मनात आला, तो हा- “या बायका शिकलेल्या नव्हत्या का? त्यांना कळले नाही का?” पण हा प्रश्न जितका साधा वाटतो, तितका तो साधा नाही. कारण खरातच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये केवळ अशिक्षित, भाबड्या महिला नव्हत्या, तर सुशिक्षित, नोकरदार, समाजात प्रतिष्ठित अशा स्त्री-पुरुषांचाही समावेश होता. हे वास्तव आपल्याला एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जाते- शिक्षण घेतलेला, जगाचा अनुभव असलेला, विचार करण्याची क्षमता असलेला माणूस भोंदूच्या जाळ्यात का आणि कसा अडकतो? त्याचा विवेक जातो कुठे? त्याची विचारशक्ती गोठते का? आणि सर्वात महत्त्वाचे- […] - [नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!](https://kiranhegdelive.com/a-fusion-of-glamour-and-cultural-heritage-in-nashik/): महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल उचलले आहे. मुंबईच्या ग्लॅमरसह नाशिकच्या सांस्कृतिक वारशाला साजेसे दागिने आता एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने, नाशिकच्या सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांसाठी हा सुवर्णयोग ठरत आहे. नाशिकमधील या नवीन शोरूममध्ये केवळ सोन्याचेच नव्हे, तर हिरे, प्लॅटिनम आणि चांदीच्या दागिन्यांचेही विशेष कलेक्शन मांडण्यात आले आहे. आगामी लग्नसराई आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, नाशिकच्या चोखंदळ ग्राहकांसाठी कंपनीने ‘कस्टम-मेड’ दागिन्यांची विशेष सुविधा उपलब्ध करून […] - [तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची 'गोडी'!](https://kiranhegdelive.com/rate-of-sugar-will-increase-after-three-four-months/): जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि ‘साखरेचे भौतिकशास्त्र’ कारणीभूत आहे. हवामानाचा ‘खेळ’: ला निना आणि साखरेचे उत्पादन 2026च्या सुरुवातीला ‘ला निना’ या हवामान स्थितीचा प्रभाव जाणवू लागला आहे. याचा थेट परिणाम जगातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक देशांवर होतोय. ब्राझीलमध्ये पावसाची ओढ लागल्याने तेथील ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, भारत आणि थायलंडमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने सुरुवातीला पीक चांगले आले असले, तरी अतिवृष्टीमुळे उसातील साखरेचे प्रमाण […] - ['हाय व्होल्टेज' ड्रामा! सर्वाधिक बोली लावूनही वेदांताला वाटाण्याच्या अक्षता!!](https://kiranhegdelive.com/high-voltage-drama-vedanta-loses-the-game-despite-being-the-highest-bidder-writes-vikrant-patil/): भारतीय कॉर्पोरेट जगतात सध्या एका मोठ्या ‘टग ऑफ वॉर’ची चर्चा आहे. कर्जबाजारी असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स या कंपनीला खरेदी करण्याच्या शर्यतीत वेदांता समूहाने सर्वाधिक बोली (एच-१ बिडर) लावली होती. मात्र, बँकांनी (बँकर्स कमिटी) वेदांताला बाजूला सारत गौतम अदाणींच्या ‘अदाणी एंटरप्रायजेस’च्या पारड्यात आपले वजन टाकले आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर वेदांताचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर केलेली एक भावनिक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. काय आहे अनिल अग्रवाल यांची ‘ती’ पोस्ट? २९ मार्च २०२६ रोजी अनिल अग्रवाल यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर आपली भूमिका मांडली. त्यांनी भगवद्गीतेतील १५व्या अध्यायाचा संदर्भ देत लिहिले की, “आम्हाला लेखी स्वरूपात कळवण्यात आले होते की, आम्ही ही […] - [सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!](https://kiranhegdelive.com/207-gr-issued-on-sunday/): काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. विकासकामांसाठीचा निधी मुदती संपण्यापूर्वी खर्च व्हावा, या उद्देशाने ही ‘जीआर’ची आतषबाजी करण्यात आली आहे. आर्थिक वर्षाचा शेवट आणि निधीची घाई दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस अशाप्रकारे जीआर काढण्याची लगबग पाहायला मिळते. जर ३१ मार्चपूर्वी संबंधित कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही किंवा निधी वितरीत झाला नाही, तर तो निधी ‘लॅप्स’ होतो, म्हणजेच पुन्हा सरकारी तिजोरीत जमा होतो. […] - [तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!](https://kiranhegdelive.com/neelam-gorhes-counterattack-on-trupti-desais-allegations/): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील वाकयुद्धामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर आणि काही विशिष्ट संस्थांना झुकते माप दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. देसाई यांच्या दाव्यानुसार, काही सरकारी प्रकल्पांच्या निधी वितरणात आणि निर्णयांमध्ये राजकीय प्रभाव वापरला गेला आहे. “पीडित महिलांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय सोयीला प्राधान्य दिले जात आहे,” असे म्हणत देसाई यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची […] - [युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!](https://kiranhegdelive.com/investors-lost-millions-of-rupees-due-to-war/): पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली, ज्यामुळे देशातील सामान्य गुंतवणूकदारांच्या कष्टाचे लाखो कोटी रुपये काही तासांतच मातीमोल झाले आहेत. तेलाचा भडका; भारतासाठी चिंतेची बाब इराणच्या तेल ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) पुरवठा साखळीला मोठा तडा बसला आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेल्याने भारतासारख्या आयातदार देशासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत असून, […] - [शरद पोंक्षेंच्या विधानाने खळबळ, भाजपाई अस्वस्थ!](https://kiranhegdelive.com/sharad-ponkshes-statement-creates-a-stir-bjp-members-are-restless/): प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि सावरकरभक्तीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. “मी भाजपसारखे दहा पक्ष उभे करू शकतो,” असे खळबळजनक विधान पोंक्षे यांनी केल्यामुळे राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पोंक्षे यांच्या या विधानाचा भाजपनेही खरपूस समाचार घेतला असून त्यांना जमिनीवर येण्याचा सल्ला दिला आहे. नेमकं प्रकरण काय? शरद पोंक्षे, हे नेहमीच भाजपच्या विचारसरणीच्या जवळ जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही मुद्द्यांवरून त्यांचे आणि भाजपच्या काही नेत्यांचे मतभेद समोर येत होते. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पोंक्षे यांचा संयम सुटलेला पाहायला […] - [एकनाथ शिंदेंचा उधळलेला वारू रोखण्यासाठी देवाभाऊंचे 'मिशन खरात'?](https://kiranhegdelive.com/is-devabhaus-mission-kharat-to-stop-eknath-shindes-political-ambition-asks-aniket-joshi-excessive-anger/): जगात “एपस्टीन” आणि राज्यात “खरात स्टिंग” अशी दोन प्रकरणा सध्या गाजत आहेत. कदाचित युद्ध सुरू आहे एपस्टीनवरून लक्ष वळवण्यासाठी. खरात स्टिंगवरून लक्ष उडवण्यासाठी एखादं दुसरे वेगळे प्रकरण घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्ध लांबले तर “घरगुती गॅसचा तुटवडा” हे प्रकरण खरात प्रकरणावरून लक्ष विचलित होण्यासाठी पुरेसे आहे. तसे घडल्यास ते महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. कॅप्टन अशोक खरात हा गेली वीस-पंचवीस वर्षे भविष्यकथन करतो आहे. जमिनी घेणे, जमिनी विकणे हा व्यवसायही तो करत होता. अलिकडे त्याने जमिनी खरेदी करून माया जमवण्याचाही सपाटा लावलेला होता. रूपाली चाकणकरांचे प्रस्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढले होते आणि पुणे मनपाची २०१७मधली निवडणूक हरल्यानंतर त्यांना शहर […] - [खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू](https://kiranhegdelive.com/suspicious-death-of-ex-soldier-in-sanghar-khed/): रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात तर कुणी सैन्यात! तर अशा या मोऱ्यांच्या वस्तीत जगन्नाथ झिमजीराव मोरे १२ मार्चपर्यंत राहत होते. १२ मार्च रोजी चिपळूण येथील लाईट हेल्थ केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८० वर्षांचे होते. जगन्नाथराव सैन्यात असल्याने आपली तब्येत सांभाळून होते. त्यांच्या अचानक मृत्यूच्या बातमीने त्याच्या जवळच्या नातेवाईकांना धक्काचं बसला. मृत्यूच्या चारपाच दिवस आधीच काही नातेवाईकांशी त्यांचे फोनवर बोलणे झाले होते. […] - ['मधुबाला' हवी आहे! आहे का कोणी नजरेत?](https://kiranhegdelive.com/wanted-madhubala-is-anyone-in-sight-asks-dilip-thakur/): चित्रपट निर्मितीत सगळ्यात अवघड चरीत्रपट. मग तो चित्रपट रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ (१९८३) असेल तर त्यावरच्या प्रचंड संशोधन, अभ्यास, चर्चा, मेहनत, खर्च यावर आणखी एक चित्रपट निर्माण होईल. तसा अतिशय प्रभावी चरीत्रपट तो एकच. तसं पाहिलं तर अनेक भाषेतील अनेकतरी चरित्रपट आपल्या देशात आले. त्याचे तपशील, माहिती, गोष्टी, किस्से, संदर्भ अनेक. कलाकारांवरही चरित्रपट येतात. आता ‘मधुबाला’वर चरित्रपट निर्माण केला जातोय, धक्का बसला? पण सर्वात मोठी अडचण निर्माण झाली आहे ती, ‘मधुबाला’ साकारणार कोण? तितकाच अथवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, ‘ती’ मधुबाला खरंच वाटेल का? भलेही उच्च दर्जाचे रंगभूषाकार असोत, कल्पक वेशभूषाकार असोत, अनुभवी छायाचित्रणकार असोत, व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा […] - [रोहित पवारांचे 'टार्गेट- तटकरे आणि पटेल' वैफल्यातून!](https://kiranhegdelive.com/rohit-pawars-target-tatkare-and-patel-due-to-frustration-says-vaijayanti-kulkarni-apte/): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय. सतत कुठल्या ना कुठल्या वादात हा पक्ष सापडताना दिसतो आहे. आता अखेर भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात रूपाली चाकणकर ह्यांनी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भोंदूबाबा अशोक खरातचे पाय धुतानाचे, त्याच्या डोक्यावर छत्री धरतानाचे त्यांचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते. त्यामुळे विरोधी पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षातही त्यांच्याबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी पक्षातीलच चाकणकरांच्या विरोधक रूपाली ठोंबरे त्यांच्यामागे हात धुवून लागल्या होत्या. त्यातच भर पडली आहे तृप्ती देसाई ह्यांची. चाकणकरांच्या […] - [केरळवासियांना काल नव्याने मिळाली 'मोदींची गॅरंटी'!](https://kiranhegdelive.com/kerala-voters-got-modi-guarantee-again/): केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा ‘मुंडू’ (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजप-एनडीएच्या प्रचारात चैतन्य फुंकण्यासाठी आयोजित या दौऱ्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, याला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला. पलक्कड येथील ‘फोर्ट मैदान’वर झालेल्या भव्य जनसभेत मोदींनी चक्क ‘चेंडा’ (केरळचे पारंपारिक वाद्य) वाजवून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी एलडीएफ आणि विरोधी यूडीएफ या दोन्ही आघाड्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत कडाडून टीका केली. “केरळला ५ लाख कोटींच्या कर्जात बुडवून दोन्ही आघाड्यांनी […] - [मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान](https://kiranhegdelive.com/tree-sanjeevani-campaign-to-be-launched-in-mumbai-from-april-1/): मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट-काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची […] - [बोटाच्या हलक्याशा हालचालीने झाले उपचार व चालायला लागला रुग्ण!](https://kiranhegdelive.com/the-treatment-was-done-after-observed-a-light-movement-of-the-finger-and-the-patient-started-walking/): बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्पाइन सर्जरीमुळे त्यांना नवजीवन मिळालं असून, आज ते स्वतःच्या पायावर चालत आहेत. वरवडे कामावरून घरी परतत असताना झालेल्या अपघातात त्यांच्या मानेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले. या दुखापतीमुळे पाठीच्या कण्यावर प्रचंड दबाव आला आणि त्यांच्या खांद्याखालचा संपूर्ण भाग निकामी झाला. स्थानिक पातळीवर अनेक रुग्णालयांनी ही दुखापत अत्यंत गंभीर असल्याचे सांगत उपचार करण्यास नकार दिला. पुढील १५ दिवस ते कोणत्याही ठोस उपचारांशिवाय घरीच होते, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला. […] - [ठाण्याच्या श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १४ एप्रिलपासून](https://kiranhegdelive.com/thanes-shri-mavali-state-level-kabaddi-tournament-from-april-14/): ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३वी राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा मंगळवार, १४-०४-२०२६ ते शनिवार, १८-०४-२०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण रू. ३,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत पुरुष व महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५१,०००/- , उपविजेत्या संघाला ₹ ३१,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ ११,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पुरुष गटात व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ ५,०००/- , उत्कृष्ट चढाईपटू खेळाडूस ₹ ३,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ३,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या […] - [फुकेतमधले ‘दगडूशेट गणपती’ मंदिर ठरतंय पर्यटकांसाठी आकर्षण!](https://kiranhegdelive.com/the-dagdushet-ganapati-temple-in-phuket-is-becoming-an-attraction-for-tourists/): हिंद महासागराच्या निळ्याशार किनाऱ्यांनी नटलेले, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले थायलंडमधील फुकेत हे जगातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळापासून व्यापार, समुद्री संपर्क आणि विविध संस्कृतींच्या संगमामुळे फुकेतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बौद्ध परंपरा, मंदिरसंस्कृती, तसेच अतिथी देवो भव या तत्त्वावर आधारित आदरातिथ्यामुळे जगभरातील पर्यटक आणि व्यावसायिक येथे आकर्षित होतात. अशा या निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध फुकेतमध्ये पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून, मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा एक अनोखा उपक्रम साकार झाला आहे. दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर […] - [अमेरिकेचे दुर्मिळ 'अवाक्स' विमान इराणकडून नष्ट](https://kiranhegdelive.com/rare-us-awacs-aircraft-shot-down-by-iran/): पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला असून इराणने सौदी अरेबियातील ‘प्रिन्स सुल्तान एअर बेस’वर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या कारवाईत अमेरिकन हवाई दलाचे अत्यंत दुर्मिळ आणि मोक्याचे ‘ई-३ सेंट्री अवाक्स’ विमान पूर्णपणे नष्ट झाले. संपूर्ण अमेरिकन ताफ्यात केवळ १६ शिल्लक असलेल्या या विमानाचा नाश होणे, हा अमेरिकेसाठी मोठा धोरणात्मक धक्का मानला जात आहे, कारण हे विमान शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तेहरानवर हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये ‘इराण युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुकेंद्र आणि लष्करी तळांवर केलेल्या कारवाईपासून […] - [अमित शाहंपर्यंत भोंदूबाबा खरात पोहोचलाच कसा?](https://kiranhegdelive.com/how-did-bhondubaba-kharat-reach-amit-shah-asks-sanjay-raut/): नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे केले आहेत. खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांची थेट नावे वाचत राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “हा भोंदूबाबा तर गुन्हेगार आहेच, पण त्याच्या चरणाशी बसून राज्य चालवणारे राज्यकर्ते त्याहून मोठे अपराधी आहेत,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. राऊत यांनी आरोप केला की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे नेण्याचे काम तेव्हाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. इतकेच नव्हे तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत हा भोंदू बाबा कसा पोहोचला, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. […] - [सुशांत सिंगसाठी बिहारमध्ये एफआयआर! मात्र, अजितदादांचे वावडे!!](https://kiranhegdelive.com/fir-in-bihar-for-sushant-singh-but-no-for-ajitdada-says-dr-sukrit-khandekar/): महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. अधिवेशन पाच आठवडे. पण, प्रत्यक्षात वीस बैठका झाल्या. या काळात १९७ तास ३७ मिनिटे कामकाज झाले. पण, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूविषयी चर्चा झाली नाही. विरोधी पक्षांनी अजितदादांच्या मृत्यूवर चर्चा घडविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अजितदादांच्या विमान दुर्घटनेत घातपात किंवा कारस्थान असल्याचे आढळल्यास सरकार आकाशपाताळ एक करेल व यामागे कुणीही असले तरी त्याचा मुडदा खणून काढला जाईल, असे ठणकावून सांगितले. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते. तब्बल अकरा वेळा त्यांनी राज्याचा अर्थंसंकल्प […] - [आळसः आपल्या क्षमतांचा बळी देण्यासाठी, आपणच निवडलेले एक माध्यम!](https://kiranhegdelive.com/laziness-a-means-we-choose-to-kill-our-abilities-says-manisha-rege/): आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच ‘आळस’ नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. “आज नको, उद्या करू,” किंवा “आता खूप कंटाळा आलाय,” ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह वाटू शकते. पण हाच आळस हळूहळू सवयीचे रूप घेतो आणि आपल्या […] - ['द कंप्लीट मॅन'चे 'ॲन इनकंप्लीट लाईफ'!](https://kiranhegdelive.com/an-incomplete-life-of-the-complete-man-says-vikrant-patil/): भारतीय उद्योगजगतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, ‘रेमंड’ या जागतिक ब्रँडचे शिल्पकार आणि आकाशाला गवसणी घालणारे साहसी वैमानिक डॉ. विजयपत सिंघानिया यांचे काल, २८ मार्च २०२६ रोजी निधन झाले. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “द कंप्लीट मॅन” ही टॅगलाईन केवळ त्यांच्या ब्रँडची ओळख नव्हती, तर ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब होती. त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योजकतेच्या इतिहासातील एक झंझावाती आणि संघर्षाने भरलेले प्रकरण संपुष्टात आले आहे. विजयपत सिंघानिया यांचा प्रवास केवळ तागा आणि सुटाच्या कापडापुरता मर्यादित नव्हता. १९८०च्या दशकात जेव्हा त्यांनी रेमंडची धुरा हाती घेतली, तेव्हा त्यांनी केवळ कापड विकले नाही, तर भारतीय पुरुषाला एक नवी ओळख दिली. पुरुषाने कणखर असावेच, […] - [वर्दीतल्या 'झारीतल्या शुक्राचार्यां'कडून पीडितांच्या अब्रूचे धिंडवडे?](https://kiranhegdelive.com/is-insults-to-the-victims-reputation-from-some-persons-in-police-itself-ask-vikrant-patil-shukracharyas-in-jari-in-uniform/): गल्लीपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात सेक्स स्कँडलमध्ये आता एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वळण आले आहे. ज्या पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन सरकार देत आहे, त्याच महिलांचे अत्यंत वैयक्तिक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे आणि काही गुन्हेही दाखल झाले आहेत; मात्र खरा प्रश्न हा आहे की, ज्या व्हिडिओंचा ‘मास्टर पेन ड्राईव्ह’ पोलिसांच्या ताब्यात आहे, ते व्हिडिओ बाहेर येतातच कसे? पोलीस यंत्रणेतच बसलेले कुणी ‘झारीतले शुक्राचार्य’ या पीडितांच्या अब्रूचा लिलाव करत आहेत का? असा जळजळीत प्रश्न आता विचारला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या […] - [रुपया प्रथमच ९५ पार; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळी!](https://kiranhegdelive.com/rupee-crosses-95-for-the-first-time-historic-low-against-dollar/): जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे भारतीय रुपयाला मोठा धक्का बसला असून, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तो प्रथमच ९५ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात रुपयामध्ये सुमारे ५% घसरण झाली आहे. प्रामुख्याने मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरवर गेल्याने भारताचा आयात खर्च प्रचंड वाढला आहे. भारत आपल्या गरजेच्या ८५% ते ९०% कच्चे तेल परदेशातून डॉलरमध्ये खरेदी करत असल्याने रुपयावर हा ताण आला आहे. रुपयाच्या या घसरणीला जागतिक गुंतवणुकीतील बदलही कारणीभूत आहेत. अमेरिकेतील व्याजाचे दर चढे असल्याने आणि जागतिक बाजारपेठेत अस्थिरता असल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. या घसरणीवरून आता […] - [महाराष्ट्रात उद्या आणि परवा पुन्हा अवकाळी पाऊस?](https://kiranhegdelive.com/is-unseasonal-rain-again-in-maharashtra-tomorrow-and-the-day-after/): मार्च महिन्याच्या अखेरीस राज्याच्या हवामानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे असून महाराष्ट्रात खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उद्या, 30 आणि मंगळवारी, 31 मार्च रोजी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याचीही भीती व्यक्त केली आहे. प्रादेशिक हवामान विभागांचा अंदाज पुणे व मुंबई विभाग: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कर्नाटक सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये 30 मार्च रोजी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.नागपूर विभाग: विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता अधिक आहे.खान्देश: जळगाव, धुळे आणि […] - ['ते' जन्मलेच नाही... पण त्याचाही असतो एक दिवस!](https://kiranhegdelive.com/he-was-not-born-but-he-too-will-have-a-day-says-dr-nivedita-patil/): कॅलेंडरवर नजर टाका. २५ मार्च नुकताच संपला. अनेक राष्ट्रीय अन् जागतिक दिवसांच्या गर्दीत एक दिवस लपलेला असतो, जो भारतात जवळजवळ कुणाला माहीतच नाही. इंटरनॅशनल डे ऑफ दी अनबोर्न चाईल्ड अर्थात जागतिक अजन्मा बालक दिन. ज्या बाळाने कधी पहिला श्वास घेतला नाही, ज्याने डोळे उघडले नाहीत, ज्याने आई म्हणून हाक मारली नाही- त्याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय दिवस? हे ऐकताना विचित्र वाटेल. पण या दिवसाच्या मागे एक विलक्षण इतिहास आहे आणि भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. १३ नोव्हेंबर १९९८. व्हॅटिकनमध्ये एक खास भेट झाली. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम पोप जॉन पॉल द्वितीय यांना भेटले. या खासगी भेटीत मेनेम यांनी एक असामान्य प्रस्ताव […] - [आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!](https://kiranhegdelive.com/no-hike-in-petrol-diesel-prices-is-this-effect-of-assam-bengal-elections/): पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांना होणारा तोटा भरून काढणे हा आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी तूर्तास तरी पेट्रोल+डिझेल दर कमी होणार नाहीत. पेट्रोल पंपावरील इंधन विक्री दर ग्राहकांसाठी सध्यातरी स्थिर ठेवण्यात आले आहेत. आसाम, प. बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दूचेरी, या ५ राज्यांत येत्या महिन्यात, एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता […] - [नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!](https://kiranhegdelive.com/new-era-begins-in-nepal-35-year-old-balen-shah-becomes-prime-minister/): नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत देशाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना काठमांडू येथील ‘शीतल निवास’ येथे पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच मधेश प्रदेशातील एका तरुण नेत्याने पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे. बालेन शाह यांच्या ‘राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी’ने (आरएसपी) ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या निवडणुकीत २७५ पैकी १८२ जागा जिंकून निर्भेळ बहुमत मिळवले. त्यांनी झापा-५ या मतदारसंघातून माजी पंतप्रधान […] - [चमत्कार को नमस्कार! भय्यू महाराज ते कॅप्टन खरात!!](https://kiranhegdelive.com/salutations-to-the-miracle-bhaiyyu-maharaj-to-captain-kharat-writes-nitin-sawant/): 2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू महाराजांचा इंदूरला मोठा आश्रम होता. या आश्रमात महाराष्ट्रातील मोठमोठ्या राजकारण्यांची उठबस असे. भय्यू महाराजांना पैसे कमावण्याची अजिबात इच्छा नव्हती. फक्त राजकारणी आपल्या आश्रमात येतात आणि आपला आशीर्वाद घेतात यामध्येच मोठेपणा होता.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीय भय्यू महाराजांचे फॅन होते. त्यानंतर राज ठाकरेही भय्यू महाराजांच्या इंदूरच्या आश्रमात जाऊन आले होते. भय्यू महाराज भोंदू होते असे माझे अजिबात म्हणणे नाही. […] - [अभिनेता ऐश्वर्य ठाकरेची दमदार सुरूवात!](https://kiranhegdelive.com/actor-aishwarya-thackerays-strong-debut/): अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याने निशानची, या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी बेस्ट डेब्यू मेल (ज्युरी चॉइस) हा सन्मान मिळवत हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे. हा पुरस्कार ऐश्वर्य ठाकरे यांच्या अभिनय कारकिर्दीतील पहिला मोठा सन्मान आहे. निशानचीमधील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठे कौतुक होत आहे. या यशाबद्दल बोलताना त्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे आभार मानले. ते म्हणाले की, “माझ्यावर विश्वास दाखवून मला त्यांच्या सिनेमाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल मी अनुराग सरांचा आभारी आहे. अनेक लोक त्यांना जीनियस किंवा मॅव्हेरिक म्हणतात, पण माझ्यासाठी ते अत्यंत प्रामाणिक सर्जनशील व्यक्तिमत्त्व आहेत आणि त्यांच्यासोबत माझा […] - ['आई रिटायर होतेय..' 'काका' कधी होणार?](https://kiranhegdelive.com/mom-is-retiring-when-wil-dad-be/): अशोक पाटोळे यांनी लिहिलेले “आई रिटायर होतेय” हे नाटक चाळीस वर्षांपूर्वी रंगमंचावर आले होते. भक्ती बर्वे यांच्या मुख्य भूमिकेने ते गाजले होते. बाळ कर्वे यांचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. पण प्रभाव भक्ती बर्वे यांचा राहिला. सध्या चर्चा सुरु असलेल्या एका विषयाशी सुसंगत असा नाटकाचा विषय वाटला, म्हणून प्रतिकात्मक पद्धतीने इथे मांडावा असे वाटले.रिटायर होते म्हणजे एखाद्या कामातून बाजूला होणे. वर उल्लेख केलेल्या नाटकात घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असताना सगळ्यांचे मूड सांभाळणे आले. विशेषतः एकत्र कुटूंबपद्धती असते तिथे स्वयंपाकघर जिच्या हाती किंवा जबाबदारीवर असते ती आई, ती आता पन्नाशी उलटलेली आहे. सगळ्या कुटुंबाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी धडपडत आहे. पण तिची ओढाताण होते […] - [मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर](https://kiranhegdelive.com/selection-tests-for-mumbai-divisional-sports-excellence-centre-announced/): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी त्यांना घडवणे, हा आहे. या उपक्रमांतर्गत वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, शूटिंग व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांसाठी विभागीय स्तरावर निवडचाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंचे कौशल्यपरीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे. निवड चाचणी तपशील पुढीलप्रमाणे: १) वेटलिफ्टिंग-   ठिकाण: तालुका क्रीडा संकुल, कोपरी, ठाणे   संपर्कप्रमुख: हिमानी परब (८३६९७१६०४६)   दिनांक: […] - [स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!](https://kiranhegdelive.com/a-market-of-hypocrisy-in-nashik-the-birthplace-of-swatantryaveer-savarkar-writes-vikrant-patil/): ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या ‘दरबारात’ आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना करून जातीभेदाच्या भिंती जमीनदोस्त […] - [८४ सामने-वेळापत्रक जाहीर! 'आयपीएल'चा महासंग्राम उद्यापासून!](https://kiranhegdelive.com/the-grand-battle-of-this-years-ipl-starts-tomorrow/): क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले होते; पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर आता उर्वरित ५० सामन्यांचेही वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आयपीएलच्या १९व्या पर्वाची ही सुरुवात म्हणजे क्रिकेटविश्वासाठी एक मोठी दिवाळीच! उद्घाटन सामना आणि ठळक वैशिष्ट्ये विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना २८ मार्चला चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. त्यापाठोपाठ २९ मार्चला मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान स्वीकारेल, तर […] - [महाराष्ट्रात 'लॉकडाऊन'?](https://kiranhegdelive.com/is-lockdown-in-maharashtra/): पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. “ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार” या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही तासांतच व्हायरल झाली. कोरोना काळातील आठवणी ताज्या असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांकडे धाव घेतली आणि अनेक शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या. केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करत लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले. पेट्रोलियम मंत्रालयाने निवेदन जारी करून देशात इंधनसाठा पुरेसा असल्याचे सांगितले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. मात्र, सरकारचे आवाहन […] - [इराण-अमेरिका संघर्षात पुढचे ४८ तास महत्त्वाचे!](https://kiranhegdelive.com/the-next-48-hours-are-crucial-in-the-iran-us-conflict/): पश्चिम आशियातील युद्धज्वाळा आता थेट जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे इराणने भारतासाठी होर्मुझ खुले केले असले तरी दुसरीकडे, अमेरिका आणि इस्त्राईलला कडक इशारा दिला आहे. इराणने येमेनजवळील बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. लाल समुद्र आणि अदन आखाताला जोडणारी ही सामुद्रधुनी जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असून, तिच्या बंदीमुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील आणि आधीच डळमळीत असलेली जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीनंतर बाब-अल-मंदेब हा जगातील दुसरा सर्वाधिक संवेदनशील तेलमार्ग असून, दररोज सुमारे ४० लाख बॅरल तेलाची या मार्गाने वाहतूक होते. त्यामुळे पुढील ४८ ते ७२ तास या संघर्षाच्या दिशादर्शनाच्या दृष्टीने […] - [येथे घडताहेत उद्याचे जिम्नास्ट...](https://kiranhegdelive.com/tomorrows-gymnasts-are-being-cultivated-here-says-suhas-joshi/): चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या क्रीडा‌ संकुलातील सुसज्ज भव्य हॉलमध्ये गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ चांगले युवा जिम्नास्ट घडवण्याचा अखंड यज्ञ सुरु आहे. त्यांच्या या तपस्येला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले असून त्यांचे अनेक खेळाडू प्रकाशात आले, ज्यांनी मग संस्थेचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. जिम्नॅस्टिक्सबरोबर मल्लखांब खेळातदेखील त्यांचे खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या ३०पेक्षा जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर १००पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय आणि २००पेक्षा जास्त खेळाडूंनी राज्य स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांच्या सागर ओव्हाळकरला केंद्र सरकारचा मल्लखांब खेळातील पुरुषांमधील पहिला अर्जुन पुरस्कार मिळाला. […] - [निवडणुकीत अपयश, तरीही मराठी मनात मनसेचाच बोलबाला!](https://kiranhegdelive.com/despite-the-election-failure-mns-still-dominates-marathi-minds-says-dr-sukrit-khandekar/): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विसावा वर्धापनदिन मुंबईतील शिवतीर्थावर सालाबादाप्रमाणेच दिमाखदार साजरा झाला. मनसेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या वीस वर्षाxत विधानसभेत, महापालिकेत किंवा नगर परिषदांमध्ये फारसे यश लाभले नाही. नाशिक महापालिकेतील एकदा मिळालेली सत्ता वगळता नंतर कुठे फारशी चमकदार कामगिरी पक्षाने बजावली नाही. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हा पट्टा वगळता पक्षाने पक्षबांधणी आणि निवडणुका यावर फारसे गांभर्याने बघितले नाही. गेल्या २० वर्षांत पक्षाचे अनेक ताकदवान नेते मनसे सोडून भाजपा किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. मनसेमध्ये राजकीय भविष्य दिसत नसल्यानेच ते राज ठाकरे यांची साथ सोडून गेले. पण वीस वर्षांत राज ठाकरेंच्या सभांना गर्दी कायम राहिली. आज […] - [लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!](https://kiranhegdelive.com/a-bogus-baba-that-rejected-traditional-image-says-vijaykumar-kale/): कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा रहीम आहेत, कुठे पमी मावशीही आहे तर कुठे बालब्राह्मचारीही आहे. ढोंगी ‘बुवा’ (अन बायाही) हा फार प्राचीन काळापासून मानवी समाजाला जडलेला एक महारोग आहे. सर्व धर्मांत आणि सर्व समाजात तो आढळून येतो. हिंदू समाजाच्या तर तो हाडीमासी खिळून बसलेला आहे. तुकोबांनी तर ‘लांब लांब जटा’ वाढवणाऱ्या ‘टिळा-टोपी-माळा-मुद्रा’ ही संतचिन्हे लेवून ‘परद्रव्य-परनारी’ याची अभिलाषा बाळगणाऱ्या या भोंदू ‘रसना-शिष्णाच्या अंकिता’ची थोबाडे फोडलेली आहेत. […] - [मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!](https://kiranhegdelive.com/chief-minister-fadnvis-used-harsh-words-for-rohit-pawar/): महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार यांच्या विमानअपघातातील मृत्यूनंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी वारंवार काही आरोप केले आहेत. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच विस्तृत निवेदन करताना गुरुवारी विधानसभेत या घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच, थेट शब्दांत न सुनावता त्यांनी आमदार रोहित पवार यांना राजकारण करू नका, हे सांगून गेल्या सात-आठ वर्षांत आपल्यापेक्षा अन्य कोणाही राजकारण्याशी अजितदादांची मैत्री नव्हती, असेही ठासून सांगितले. अजित […] - [असा साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!](https://kiranhegdelive.com/celebrate-shriram-janmotsav-today-at-12-noon/): श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘श्रीराम’! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्रीरामनवमीचा इतिहास आणि महत्त्व, हा उत्सव साजरा करण्याची पद्धत, श्रीराम उपासनेच्या संदर्भातील काही धार्मिक कृती यांची माहिती आणि रामनामाचे महत्व यांविषयी जाणून घेणार आहोत. रामनवमीला श्रीरामाची […] - [बरोबर २३७ वर्षांपूर्वी कलकत्त्यात निघाला डिजिटल भाषिक जाहिरातींचा वंशज!](https://kiranhegdelive.com/exactly-237-years-ago-the-descendant-of-regional-digital-advertising-was-found-in-calcutta-says-vikrant-patil/): २५ मार्च १७८८. कलकत्ता. इंग्रजांच्या राजवटीत एक इंग्रजी वृत्तपत्र छापले जात होते- “कलकत्ता गॅझेट.” त्या8दिवशी या वृत्तपत्राच्या पानावर काहीतरी वेगळे घडले. एका जाहिरातीत अक्षरे इंग्रजी नव्हती. ती होती बांगला, भारतीय मातीतून जन्मलेली, भारतीय माणसाच्या मनाशी बोलणारी. कलकत्ता गॅझेटमध्ये २५ मार्च १७८८ रोजी भारतीय भाषेत, बांगलामध्ये पहिली वृत्तपत्र जाहिरात प्रकाशित झाली. हे भारतीय प्रिंट मीडियाच्या इतिहासातील एक निर्णायक वळण होते, ज्याने प्रादेशिक भाषांमधील प्रकाशनांचा मार्ग प्रशस्त केला. ती जाहिरात काय होती? कुणाची होती? आज ते तपशील इतिहासाच्या धुक्यात हरवले आहेत. पण तिची किंमत काळाच्या कसोटीवर सोन्यासारखी खरी उतरली आहे. कारण त्या छोट्याशा बांगला ओळींनी एक प्रश्न जगासमोर ठेवला-9 “तुमच्या भाषेत बोलणाऱ्या […] - [महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?](https://kiranhegdelive.com/will-maharashtra-get-72-mps-instead-of-48/): भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार “नारी शक्ती वंदन अधिनियम”मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३ जागा केवळ महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. विशेष म्हणजे, या वाढीव जागा महिलांसाठी राखीव असल्यामुळे सध्या लोकसभेत असलेल्या पुरुष खासदारांच्या जागांवर कोणताही परिणाम होणार नाही. या ऐतिहासिक बदलामुळे लोकसभेतील बहुमताचा जादुई आकडाही २७२ वरून ४०९पर्यंत वाढेल. महाराष्ट्रासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. प्रस्तावित परिसीमनानुसार प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये ५०% वाढ होणार असल्याने महाराष्ट्राच्या लोकसभा जागा ४८ वरून थेट ७२ होतील. त्यापैकी २४ जागा महिलांसाठी […] - [इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!](https://kiranhegdelive.com/war-with-iran-is-a-gamble-for-america/): आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे. हे युद्ध अमेरिकेला आणि पर्यायाने जगाला एका भीषण मंदीच्या गर्तेत ढकलू शकते. या संघर्षाचा सर्वात मोठा आणि तत्काळ परिणाम ऊर्जा बाजारावर झाला आहे. इराणने प्रत्युत्तर म्हणून ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ) विस्कळीत करण्याचा प्रयत्न केल्यास जगातील २०% तेलपुरवठा धोक्यात येऊ शकतो. वर्षाच्या सुरुवातीपासून तेलाच्या किमतीत झालेली जवळपास दुप्पट वाढ ही केवळ सुरुवात असू शकते. जेव्हा तेलाचे भाव वाढतात, तेव्हा वाहतूकखर्च वाढतो […] - [सत्यमेव जयते!](https://kiranhegdelive.com/satymev-jayate-says-vijaykumar-kale/): अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे ‘दळण’ सुरु होते व त्यात अनेक वर्षे वाया जातात. विजय मल्ल्या यांच्या प्रकरणावरून तर हे सिद्धच झालेले आहे. अशात आपल्याकडील कुठला अधिकारी मी माझ्या कारकिर्दीत चुका केल्या असे सांगेल! खरंतर संबंधित व्यक्तीचा प्रस्ताव समंत करण्याच्या लायकीचाच नव्हता, पण काय करणार फलाण्या मंत्र्याचा वा सनदी अधिकाऱ्याचा फोन आल्याने असे करावे लागले असेही कुणी सांगणार नाही, याची खात्री आहे. म्हणूनच हल्ली चौकशीचे चौऱ्याऐंशी हजार फेऱ्या […] - [दीडशे वर्षांनंतरही क्षयरोगाशी लढणे ही विचार करण्याची गरज](https://kiranhegdelive.com/even-after-150-years-fighting-tuberculosis-is-a-matter-of-concern-says-dr-parikshit-baviskar/): जगात दर सहा मिनिटांनी एक माणूस क्षयरोगाने मृत्युमुखी पडतो. तुम्ही हा लेख वाचून पूर्ण कराल, तोपर्यंत जगाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात एक जीव संपलेला असेल, तेही एका बरे होण्यासारख्या आजाराने. हे वाचून धक्का बसला ना? बसायलाच हवा. कारण क्षयरोग (टीबी – टीबरक्युलॉसिस) हा आजार आजही जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य मारेकरी आहे, आणि भारत या लढाईच्या केंद्रस्थानी आहे. २४ मार्च हा दिवस १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉख यांनी क्षयरोगास कारणीभूत जिवाणूचा शोध जाहीर केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी पाळला जातो. त्या एका वैज्ञानिक घोषणेने लाखो जीव वाचवण्याचा मार्ग खुला केला. पण दीडशे वर्षांनंतरही हा आजार अजून आपल्या आयुष्यात कायम आहे, हेच आपल्याला आजही थांबून विचार […] - [रजनीकांतही म्हणतात- 'बॉक्स ऑफिस का बाप'!](https://kiranhegdelive.com/rajinikanth-also-says-box-office-ka-baap/): बॉलीवूडमध्ये “सुपरस्टार” हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला “मस्ट वॉच” म्हणतात आणि त्याला “बॉक्स ऑफिस का बाप” असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले- “काय फिल्म आहे… धुरंधर २! आदित्य धर… बॉक्स ऑफिस का बाप!! रणवीर आणि सर्व कलाकार तसेच क्रू मेबर्स यांचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयाने पाहायलाच हवी अशी मस्ट वॉच फिल्म. जय हिंद”. दक्षिण भारतातील या सुपरस्टारची दखल घेणे, बॉलीवूडसाठी खूप महत्त्वाचे ठरते. दिग्दर्शक आदित्य धर यांनी रजनींच्या शब्दांनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की ते “शब्दांच्या पलीकडे ग्रेटफुल” आहेत. पाच दिवसांत काय घडले? […] - [भोंदूबाबा खरात प्रकरणात आता 'लीगल टायगर'ची एन्ट्री!](https://kiranhegdelive.com/now-legal-tiger-enters-in-to-the-bhondubaba-kharat-case/): विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह विभागाने तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा एकत्रित तपास एसआयटीकडे सोपवला असून आता त्याच्या न्यायालयीन लढाईची धुरा मिसर यांच्याकडे आली आहे. या नियुक्तीमुळे नाशिकच्या विधिविश्वात एकच चर्चा सुरू झाली आहे, कारण अजय मिसर हे नाव नाशिकच्या गुन्हेगारी खटल्यांच्या इतिहासात वेगळ्याच दबदब्याने परिचित आहे. ‘लीगल टायगर’ म्हणून ते नाशिकमध्ये ओळखले जातात. ॲड. अजय मिसर हे नाशिकच्या जिल्हा न्यायालय परिसरातील एक जुने व अनुभवी नाव. १९९४पासून […] - [फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!](https://kiranhegdelive.com/sc-protection-applies-only-to-hindu-buddhist-and-sikh-people/): एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना स्पष्ट केले की, अनुसूचित जातीचा दर्जा केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माच्या व्यक्तींनाच मिळेल. एखाद्या व्यक्तीने ख्रिश्चन किंवा अन्य कोणत्याही धर्मात धर्मांतर केले, तर तिचा एससी दर्जा तत्काळ आणि संपूर्णपणे रद्द होतो. अशा व्यक्तीला एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे संरक्षणही मागता येणार नाही. हा निकाल आंध्र प्रदेशातील एका पाद्रीने दाखल केलेल्या याचिकेवर आला. आंध्र प्रदेशातील चिंथाडा आनंद हे पाद्री म्हणून काम करतात. […] - [आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!](https://kiranhegdelive.com/nitesh-rane-will-serve-cold-coffee-to-aditya-thackeray-says-shailendra-paranjpe/): नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख केला आणि त्याबरोबरच पेंग्विनचा उल्लेख करत त्यांना कोपरखळीही मारली. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सहा मार्गांवर वॉटर मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत केली. ती करताना ते म्हणाले, आदित्य ठाकरेजी आणि वरुण सरदेसाईजी, तुम्हाला नरिमन पॉईंटला थेट जलमार्गाने मेट्रोद्वारे वेगाने येता येईल, अशी व्यवस्था आमचे सरकार करणार आहे. त्यावर आदित्य ठाकरे बसल्या जागेवरून म्हणाले की, तुम्हीही बरोबर या… त्यावर […] - [राजीनाम्याची हूल देणाऱ्या ठाकरेंच्या आमदारकीला आज निरोप!](https://kiranhegdelive.com/farewell-to-thackerays-mlc-which-was-in-pocket-after-the-announcement-of-resignation-says-kiran-hegde/): एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, विधान परिषदेतल्या आमदारकीचा राजीनामा खिशातून बाहेर काढलाच नाही. आता याच न दिलेल्या राजीनाम्याच्या आमदारकीची मुदत येत्या १३ मे रोजी संपणार आहे. त्याआधीचे त्यांचे विधान परिषदेचे हे अखेरचे अधिवेशन सध्या सुरू असून त्याचे शेवटच्या आठवड्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे आज विधान परिषद सभागृहाकडून त्यांना औपचारिक निरोप देण्यात येणार आहे. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते, असे […] - [प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!](https://kiranhegdelive.com/36-vacant-posts-in-state-service-rights-commission-to-be-filled-by-deputation/): महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ एप्रिल २०२६ आहे. यात नाशिक विभागासाठी ३ पदे रिक्त आहेत. राज्य सेवा हक्क आयोग म्हणजे सामान्य नागरिकांचे ‘तक्रार निवारण केंद्र’. शासकीय सेवा वेळेत न मिळाल्यास, जसे की, रेशन कार्ड, जन्म-मृत्यू दाखला, सातबारा उतारा, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला वैगरेबाबत नागरिक थेट या आयोगाकडे दाद मागू शकतात. या आयोगात जास्त काळ रिक्त पदे […] - [रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!](https://kiranhegdelive.com/mega-recruitment-in-railways-golden-opportunity-for-12th-pass-and-graduates/): भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश आहे. पदांचा तपशील (एकूण पदे: ११,५५८) या भरतीची विभागणी दोन स्तरांवर करण्यात आली आहे: वयोमर्यादा आणि सवलतपदवीधर पदांसाठी: १८ ते ३६ वर्षे.बारावी पास पदांसाठी: १८ ते ३३ वर्षे. निवडप्रक्रिया कशी असेल? उमेदवारांची निवड दोन टप्प्यांतील संगणक आधारित परीक्षा (सीबीटी १ आणि सीबीटी २)द्वारे केली जाईल. त्यानंतर पदाच्या आवश्यकतेनुसार टायपिंग टेस्ट किंवा अ‍ॅप्टिट्युड टेस्ट घेतली जाईल आणि शेवटी कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय […] - [शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन](https://kiranhegdelive.com/close-aide-of-sharad-pawar-datta-meghe-passes-away/): जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता’ ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे काल सायंकाळी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी मेघे, पुत्र माजी आमदार सागर मेघे, आमदार समीर मेघे, मुली स्मिता मेघे धारकर आणि संगीता मेघे ग्रोवर व सून देविका आणि वृंदा, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज पवनार येथे शासकीय इतमामाने होणार आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी, पांडे […] - [राहुलजींची मौजमजा तर काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांच्या नेतृत्त्वाचाच कचरा!](https://kiranhegdelive.com/rahuljis-fun-and-mlas-trash-out-his-leadership-says-aniket-joshi/): नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचलेले शरद पवार हे त्यांच्या रा.काँ.श.प. पक्षाचे एकमेव राज्यसभा सदस्य सध्या आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे नातू पार्थ अजित पवार आणि सुनबाई सुनेत्रा हेही सध्या राज्यसभेत दिसणार आहेत. याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, धनगर नेते रामराव वडकुते आणि आदिवासी कार्यकर्त्या माया ईवनाते असे चार तर  एकनाथ शिंदेंच्या सेनेच्या ज्योती वाघमारे हेही महाराष्ट्रातून बिनविरोध राज्यसभा सदस्य बनले आहेत. मार्च २०२६मध्ये राज्यसभेच्या निवडणुका दहा राज्यांत होत्या. त्यातील फक्त बिहार, हरयाणा व ओडिसा, या तीन राज्यातच प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली. कारण तिथे भारतीय जनता पक्षाने आपल्या अतिरिक्त मतांच्या जोरावर एकएक अधिकचा उमेदवार दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे संघटनात्मक दौर्बल्यही पुन्हा […] - [यंदा पुन्हा रंगली हापूसच्याच गोडीची चर्चा!](https://kiranhegdelive.com/this-year-the-discussion-about-the-sweetness-of-hapus-has-become-lively-again-says-manohar-sapre/): दरवर्षी मार्च महिना उजाडला की, आंब्याच्या, खासकरून हापूसच्या गोडीची चर्चा सुरु होते. हवामान हवे तसे हेलकावे खात असल्यामुळे त्याच्या परिणामांची चर्चा आपण सारे करीतच असतो. नको त्या वेळी म्हणजे रात्री दहीवडा खाल्ला किंवा आंबट ताक प्यायले की सर्दी होणारच. दुसऱ्या दिवशी सकाळी नाक गळायला लागले की, आपण दोष देणार तो व्हायरल वातावरणाला. तर असे वातावरण बदलले की पिकांवर परिणाम होणे आलेच. गेल्या काही वर्षांत अशा बदलत्या वातावरणाचा अनुभव आपण घेत आहोत. मी मुख्यतः महाराष्ट्रात असलेल्या परिस्थितीच्या संदर्भात बोलतो आहे. तर मार्च महिन्यात चर्चा सुरु होते ती आंब्याची. कोकणात शिमगोत्सव अनुभवायला गेलेल्या लोकांना आंबा खायला मिळण्याचा योग फारसा येत नाही. कुठकुठे […] - [सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!](https://kiranhegdelive.com/foldable-iphone-18-coming-in-september/): ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे. किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास असेल. वाढत्या घटकखर्चाला न जुमानता ॲपल किंमती स्थिर ठेवण्यासाठी पुरवठादारांशी […] - [इस्रायलमधल्या 'मिनी इंडिया'वर इराणचा हल्ला!](https://kiranhegdelive.com/iran-attacks-mini-india-in-israel/): इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील ‘डिमोना’ आणि ‘अराड’ या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या ‘नतान्झ’ आण्विक केंद्रावरील हल्ल्याची ‘प्रतिक्रिया’ असल्याचे जाहीर केले. या युद्धात प्रथमच इराणची क्षेपणास्त्रे इस्रायलच्या अणुऊर्जा केंद्राच्या परिसरातील हवाई संरक्षणप्रणालीला भेदण्यात यशस्वी ठरली. हे या संघर्षाचे नाट्यपूर्ण नवे वळण आहे. डिमोना हे शहर इस्रायलच्या ‘शिमोन पेरेझ नेगेव्ह न्यूक्लिअर रिसर्च सेंटर’पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. या शहरात जगभरातून स्थलांतरित झालेल्या भारतीय यहुद्यांची मोठी वस्ती असल्याने त्याला ‘मिनी-इंडिया’ असेही म्हटले जाते. इस्रायलचे पंतप्रधान […] - [भौतिकशास्त्रातली शंभर वर्षांपासूनची कोडी सुटली अवघ्या सेकंदात!](https://kiranhegdelive.com/a-100-year-old-puzzle-in-physics-solved-in-just-seconds-says-vikrant-patil/): विज्ञान जगतात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको आणि लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीच्या संशोधकांनी THOR (थोर) नावाची एक नवी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संगणकीय प्रणाली विकसित केली आहे, जी सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील सर्वात कठीण समस्यांपैकी एक सोडवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही समस्या म्हणजे पदार्थाच्या आत अणू एकमेकांशी कसे वागतात, याचे अचूक गणन करणे. गेल्या शंभर वर्षांपासून शास्त्रज्ञांना हे काम करणे जवळपास अशक्य वाटत होते. ‘कॉन्फिगरेशनल इंटिग्रल’: शंभर वर्षांची अशक्य समस्या या समस्येला ‘कॉन्फिगरेशनल इंटिग्रल’ म्हणतात, जे विविध दाब आणि तापमानात पदार्थ कसे वागतात, हे सांगते. UNM चे प्राध्यापक दिमित्री पित्सेर यांच्या मते, “पारंपारिकपणे हे थेट सोडवणे […] - [अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल](https://kiranhegdelive.com/farmers-from-north-maharashtra-to-vidarbha-are-in-distress-due-to-unseasonal-rains-and-hailstorms/): गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही निसर्गाने शेतकऱ्यांची साथ दिली नाही. ऐन रब्बी काढणीच्या काळात अवकाळीचे संकट कोसळले. उत्तर महाराष्ट्र (खान्देश): नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खानगाव, कोटमगाव आणि लासलगाव परिसरात गारपिटीने द्राक्षबागांची पाने झडली, वेल जमिनीवर कोसळले; काढणीला आलेला गहू व कांदाही भिजला. नाशिकच्याच देवळा तालुक्यात रामनगर, ओबारा व दहिवड परिसरात कांदा, डाळिंब, गहू आणि कांद्याच्या टोंगळ्यांचे अतोनात नुकसान झाले. खान्देशात धुळे जिल्ह्यात साक्री, शिरपूर, शिंदखेडा […] - [रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!](https://kiranhegdelive.com/ranveer-overtakes-sahrukh-khan-on-the-first-day/): 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंदर 2 : द रिव्हेंज’ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर ठरला. शाहरुख खानच्या ‘जवान’चा (₹ 75 कोटी) विक्रम मोडत, रणवीर सिंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कमाई नोंदवली. हा फक्त एक चित्रपट नाही, हे Gen-Z च्या थिएटर प्रेमाचं पुनरागमन आहे! आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये रणवीर सिंगने ‘जसकिरात सिंग रंगी’ उर्फ ‘हमजा अली मझारी’ ही गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानातील कराची गुन्हेगारीविश्वात खोलवर शिरलेला हा एजंट 26/11च्या हल्ल्याचा बदला घेत आणखी […] - [क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!](https://kiranhegdelive.com/want-to-score-two-to-three-thousand-runs-this-cricket-season-says-vaibhav-suryavanshi/): १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, “या हंगामात किती धावा करायच्या आहेत?” यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, “दोन-तीन हजार!” संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला. एका हंगामात टी-ट्वेण्टीमध्ये इतक्या धावा होणं जवळजवळ अशक्य असलं, तरी या निरागस महत्त्वाकांक्षेनेच सगळ्यांचं मन जिंकलं. राजस्थान रॉयल्सच्या या लहानग्या सलामीवीराने आधीच टी-ट्वेण्टीमध्ये सर्वात तरुण शतकवीर होण्याचा विक्रम नोंदवला असून आयपीएलमध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या आयपीएल हंगामात वैभवसमोर सोपी वाट नाही. तज्ज्ञांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आता सर्व गोलंदाज त्याचा बारकाईने अभ्यास करून मैदानात उतरतील. त्याच्या खेळातील कमकुवत बिंदू […] - [४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!](https://kiranhegdelive.com/menopause-before-40-that-is-the-first-letter-sent-from-the-heart/): अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास जगप्रसिद्ध ‘जामा कॉर्डिओलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून या विषयावर आजवर झालेला हा सर्वात व्यापक अभ्यास आहे. १०,०३६ महिलांच्या दशकांपर्यंतच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण करताना संशोधकांना १,०००हून अधिक हृदयविकाराच्या घटना आढळल्या, ज्यात घातक आणि बिनघातक दोन्ही प्रकारच्या हार्टअटॅकचा समावेश होता. संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे, स्पष्ट निरीक्षण रजोनिवृत्तीनंतर शरीरातील ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक (हार्मोन) कमी होते. हे इस्ट्रोजेन हृदयाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे, […] - [रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?](https://kiranhegdelive.com/why-are-gold-and-silver-prices-falling-every-day/): इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी ‘सेफ हेव्हन’ म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास आहे. मात्र यावेळी सोने आणि चांदी नेहमीच्या पद्धतीने वागले नाहीत; त्यांचे भाव घसरत आहेत. डॉलर मजबूत, व्याजदर कपात लांबली; सोन्यावर दबाव या घसरणीमागे एक मुख्य कारण आहे- होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात लवकर करावी, या अपेक्षा मागे पडल्या आहेत. यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे आणि ट्रेझरी बाँड्सकडे गुंतवणूक […] - [आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून](https://kiranhegdelive.com/atmaram-more-memorial-hospital-cricket-from-march-23/): विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८ येथे होणार आहे. जखमी क्रीडापटूंना रुग्णालयीन सेवा त्वरित उपलब्ध करण्यासाठी विविध हॉस्पिटलचे क्रिकेटपटू सहकार्य करीत असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी स्पर्धेचे सातत्य कायम राखले आहे. अजिंक्यपद पटकाविणाऱ्या संघाला रुपये पंधरा हजार पुरस्कारासह आकर्षक चषक व सर्व खेळाडूंना मेडल्सने सन्मानित केले जाणार आहे. मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा यंदा बाद पद्धतीने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीद्वारे आयोजित केली […] - [‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा 'चैत्र चाहूल' संपन्न!](https://kiranhegdelive.com/dhyas-and-rangakarmi-awards-ceremony-concluded-on-chaitra-chahool/): गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या ‘ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते […] - [अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!](https://kiranhegdelive.com/the-dream-that-ajitdada-cherished-will-be-fulfilled-says-vikrant-patil/): महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील ‘ट्रॅफिक जाम’ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. ‘मिसिंग लिंक’ जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरातील वाहतूककोंडीने वर्षानुवर्षे प्रवाशांची सहनशक्ती अजमावली आहे. चाकण […] - [तिकीट चित्रपटाचं असतं की, हायफाय मल्टीप्लेक्सच?](https://kiranhegdelive.com/is-the-ticket-for-the-movie-or-the-hi-fi-multiplex-ask-dilip-thakur/): दोन, अडिच हजार रुपयांचे तिकीट काढून पाहण्यासारखे असं आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर २’ या चित्रपटात आहे तरी काय, यावर सोशल मीडियावर चर्चा होतेय आणि त्यातूनच या चित्रपटाबाबतचे कुतूहल वाढून आपणही ‘धुरंदर २’ पाहायला हवा असे वाटत असतानाच सगळ्यात पहिला प्रश्न येतोय तो, यापेक्षाही कमी तिकीट दरात हा तब्बल चार तासांचा चित्रपट कुठे बरं पाहायला मिळेल? हवं तर मध्यंतरात काहीही खाणार नाही. ते पैसे वाचवू. आता कोणी गंभीरपणे म्हणेल, तुम्ही फारच मध्यमवर्गीय विचार करता हो… आणि तुम्ही असा आपल्या खिशाला, हा सर्व प्रकारचा मसाला खच्चून भरलेला चित्रपट कसा बरं परवडणार असा विचार करेपर्यंत अनेकांनी आपलं ऑनलाईन तिकीट बूक केलेदेखील. मग आपल्या […] - [तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!](https://kiranhegdelive.com/you-married-a-wife-not-a-maid/): सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- “तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!” न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, “स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही हातभार द्यावाच लागेल. आजचा काळ वेगळा आहे, जुनी मानसिकता बदला.” न्यायालयाचं हे वक्तव्य केवळ एका खटल्यापुरतं मर्यादित नसून कोट्यवधी भारतीय घरांतील ‘किचन पॉलिटिक्स’वर थेट भाष्य करणारं आहे. हे प्रकरण आहे एका विभक्त दाम्पत्याचं, जिथे पतीने पत्नीच्या घरगुती कामांना कोणतीही किंमत नाही, असं गृहीत धरलं होतं. पत्नीने न्यायालयात सांगितलं की, ती नोकरी सांभाळून संपूर्ण घरही एकटीने चालवते, पण पतीने याची कधीच दखल […] - [कमकुवत मनाच्या स्त्रिया लागतात खरातसारख्या भोंदू बाबाच्या नादी!](https://kiranhegdelive.com/weak-minded-women-fall-for-the-tricks-of-a-deceitful-baba-like-kharat-says-vaijayanti-kulkarni-apte/): महाराष्ट्राला अगदी लाज आणणारे स्त्रियांच्या  शोषणाचे भयानक प्रकरण समोर आले आहे. तेही नाशिकसारख्या पवित्र भूमीत, जी भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे, तिथे आणि शिर्डीसारख्या दुसर्‍या पवित्र ठिकाणी ह्या खरातने सगळ्या मर्यादा, लाज, लज्जा, शरम गुंडाळून शेकडो स्त्रियांचे शारीरिक शोषण केले. उपलब्ध माहितीनुसार शेकडो स्त्रियांना त्याने, तुझे ठरलेले लग्न मोडेल, तुझ्या पतीचे निधन होईल.. अशा धमक्या देऊन हे विकृत चाळे केले आहेत. ह्या सगळ्या प्रकाराच्या आता 200हून अधिक चित्रफिती पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यावरून अधिक माहिती बाहेर येईल. पण मुळात स्त्रिया, अशा भोंदू बाबाच्या नादी का लागतात, हा मुख्य प्रश्न आहे. कुणाचे लग्न जमत नाही, कुणाच्या नवर्‍याचे बाहेर लफडं असते, कुणाला […] - [वर्णमुद्राचे 'मोहोळ'- कौशल्य सारे रचनेत आहे!](https://kiranhegdelive.com/the-mohol-of-varnamudra-shows-the-skill-of-design-says-vijaykumar-kale/): ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले ‘मोहोळ’ हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि ‘भिडल्या’ त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. ‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही! मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे कौतुक करण्यात शहाणपण नसून वेडेपणाच दिसतोय, असं तुम्ही म्हणालही! हल्ली […] - [बदलत्या समाजमनाचा झंझावात!](https://kiranhegdelive.com/the-storm-of-changing-social-consciousness-writes-manisha-rege/): महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात अनेक क्रांतीकारी पावले पडली. पण एकविसाव्या शतकातही एका अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यासाठी एका खेड्यातून ठिणगी पडावी लागते, हे विदारक वास्तव आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील प्रमोद झिंजाडे, हे नाव आज अशाच एका मूकक्रांतीचे प्रतीक बनले आहे. त्यांनी पुकारलेला ‘विधवा प्रथा बंदी’चा लढा केवळ एका व्यक्तीचा राहिलेला नाही, तर ती आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली एक लोकचळवळ (Mass Movement) बनली आहे. गेल्या काही दिवसांत आपण राजकीय घडामोडींच्या बातम्यांत इतके गुंतलो आहोत की त्यामुळे समाजाच्या तळागाळात होणारे हे मूलभूत बदल अनेकदा दुर्लक्षित राहतात. झिंजाडे यांनी आपल्या स्वतःच्या मृत्यूनंतर पत्नीला विधवा प्रथेच्या जाचातून वाचवण्यासाठी जे ‘मृत्यूपत्र’ तयार केले, तिथून या लढ्याची […] ## Pages - [Sample Crossword](https://kiranhegdelive.com/sample-crossword/) - [home5](https://kiranhegdelive.com/home5/) - [Home v4](https://kiranhegdelive.com/home-v4/) - [Home 3](https://kiranhegdelive.com/) - [Home page version 2](https://kiranhegdelive.com/home-page-version-2/) - [तक्रार निवारणासाठी](https://kiranhegdelive.com/%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/) - [Menu](https://kiranhegdelive.com/menu/) - [Newsletter Signup](https://kiranhegdelive.com/newsletter-signup/) - [Home v2](https://kiranhegdelive.com/home-v2/) - [Disclaimer (सोयीसाठी इंग्रजीत)](https://kiranhegdelive.com/disclaimer/): The information contained in this website is for general information purposes only. The information is provided by kiranhegdelive.com, a property of Chinuli Media House (OPC) Pvt. Ltd. While we endeavor to keep the information up to date and correct, we make no representations or warranties of any kind, express or implied, about the completeness, accuracy, reliability, suitability or availability with respect to the website or the information, products, services, or related graphics contained on the website for any purpose. Any reliance you place on such information is therefore strictly at your own risk. Through this website you are able to […] - [Advertise with Us](https://kiranhegdelive.com/advertise-with-us/) - [Contact Us](https://kiranhegdelive.com/contact-us/) - [About Us (आमच्याविषयी थोडेसे..)](https://kiranhegdelive.com/about-us/): kiranhegdelive.com is a news and views venture of Leela Media Access started on 26th November 2018. Subsequently it was taken over by a firm known as Kiran Hegde Initiative. Now it is a well-known brand product of Chinuli Media House (OPC) Pvt. Ltd (Regd. Address- Bhaskar, B. 54/213, Siddharth Nagar (II), Goregaon (W), Mumbai- 400104, Maharashtra, India, Phone- 8983766299). We are member of Media9 Digital Media Federation, a self-regularity body registered with Ministry of Information and Broadcasting, Government of India. We have also registered our portal, kiranhegdelive.com with the Ministry of Information and Broadcasting, Government of India. It is also […] - [Home](https://kiranhegdelive.com/home/) - [Privacy Policy (सोयीकरिता इंग्रजी)](https://kiranhegdelive.com/privacy-policy/): This Privacy Policy applies to the kiranhegdelive.com Kiranhegdelive.com recognises the importance of maintaining your privacy. We value your privacy and appreciate your trust in us. This Privacy Policy applies to current and former visitors to our website and to our online customers. By visiting and/or using our website, you agree to this Privacy Policy. Kiranhegdelive.com is a property of Chinuli Media House (OPC) Pvt. Ltd., an Indian company having registered address Bhaskar, B-54/213, Siddharth Nagar (Part-2), Goregaon (W), Mumbai- 400104. Information we collect Contact information- We might collect your name, email, mobile number, phone number, street, city, state, pin code, […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)