Details
hegdekiran17@gmail.com
हाँगकाँगमधील आंदोलन तीव्र झाल्याने गुरूवारी सोन्याच्या किंमती ०.५६ टक्क्यांनी वाढल्या. या भागात सुरक्षाविषयक कायदे कठोरपणे राबवण्याची चीनची योजना आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगच्या जनतेला प्रतिकार करण्याची व एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेतील बेरोजगारीही हळूहळू वाढत आहे. यामुळे महामारीनंतरचा सुधारणेचा काळ अपेक्षेपेक्षा मोठा असू शकतो हे दिसून येते. आर्थिक अनिश्चिततेमुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला असून यामुळे यलो मेटलच्या किंमती वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
“स्पॉट सिल्वर किंमती ०.६९ टक्क्यांनी वाढून त्या १७.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमतीही ०.३५ टक्क्यांनी वाढून ४८,५५८ रुपये प्रति किलोनी वाढल्या.”
“वाढती मागणी आणि शुद्धीकरण प्रक्रियांमध्ये वाढ झाल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती २.७ टक्क्यांनी वाढून ३३.७ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणावाची स्थिती झाकोळण्याचे काम झाले. अमेरिकेतील एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या (ईआयए) अहवालानुसार, यू.एस. क्रूड यादीतील अभूतपूर्व वाढीमुळे कच्च्या तेलाचा नफा मर्यादित झाला.”