Details
केएचएल न्यूज ब्युरो
उदयोन्मुख तसेच नविन खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन व्हावे आणि त्यांचा खेळ उत्तरोत्तर अधिक चांगला होत जावा या उद्द्येशाने पिनॅकल स्पोर्ट्स अॅन्ड एज्युकेशन या ठाणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेने विनामूल्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.
“४ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी असलेल्या या शिबिरामध्ये टेबल टेनिस, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स आणि योगा या खेळांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर शिबिरात आयटीटीएफ, फिडे प्रमाणपत्रधारक मार्गदर्शक समीर सारळकर, प्रदीप मोकाशी, अमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.”
“दिनांक २५ ते ३० डिसेंबर २०१९ दरम्यान तलवार कंपाउंड, ओस्वाल पार्कच्या समोर, डयुरिअन फर्निचरजवळ, पोखरण रस्ता क्र. २, माजिवडा, ठाणे पश्चिम येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराचा जास्तीतजास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी नम्रता सारळकर यांच्याशी ९७५७४९६४६१ या व्हॉट्स अप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे.”