Details
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“कोरोना व्हायरस, या साथीच्या रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी अमेरिका सरकारने केलेल्या उपाययोजनांच्या आधारे जगभरातील गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन ठेवू पाहत आहेत. त्यामुळे कमोडिटीजच्या किंमती आशा आणि निराशा यांच्यादरम्यान हेलकावे खात आहेत. अमेरिकी फेडने उद्योग जगताला पाठिंबा देण्यासाठी २ ट्रिलियन डॉलर पॅकेजची घोषणा केल्याने सोने, क्रूड ऑइल, तांबे आणि बेस धातूंच्या किंमतीवर संमिश्र परिणाम झाला. याबद्दल अधिक माहिती देत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या..”
सोने:
“बुधवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत तेजी दिसून आली. ०.२ टक्क्यांच्या किंचित वाढीसह ते प्रति औंस १६१३ डॉलरपर्यंत थांबले. अमेरिका सरकारने जाहीर केलेल्या उत्तेजनपर घोषणांमुळे सराफा बाजारात सकारात्मकता दिसून आली. तसेच यामुळे कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे बाजारपेठेत पसरलेल्या भीतीवर विजय मिळवण्यात काही प्रमाणात यश आले. अमेरिकी फेडरलने आर्थिक बाजारपेठेवर परिणाम करणाऱ्या महामारीचा सामना करण्यासाठी २ ट्रिलियन डॉलर्सच्या उत्तेजनपर पॅकेजची योजना जाहीर केली आहे. अमेरिकेच्या या मोठ्या योजनेमुळे जागतिक स्तरावरील चिंता कमी होईल, अशी बाजाराची अपेक्षा आहे.”
कच्चे तेल:
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने जाहीर केलेल्या पॅकेजमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवरही सकारात्मक परिणाम झाला. बुधवारी डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती २ टक्के दराने वाढून प्रति बॅरल २४.५ डॉलरवर बंद झाल्या. पण रशिया आणि सौदी अरेबियासारख्या शीर्ष उत्पादकांनी तेल उत्पादनात वाढ केल्यामुळे तसेच कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे तेल बाजारात अजूनही निराशा दिसून आली. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केल्याने विमान वाहतूक क्षेत्र आणि रस्ते वाहतूक कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या मागणीवरही दबाव आणला जात आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजारामुळे क्रूड मागणीची शक्यता कमी होत असून अमेरिकी क्रूड इन्व्हेंट्रीचा स्तर सलग ९ व्या आठवड्याला १.६ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढला.
बेस मेटल्स:
“बुधवारी लंडन मेटल एक्स्चेंजमधील बेस मेटलच्या किंमती ‘लीड’नुसार संमिश्र आल्या असून समूहात ती सर्वाधिक किंमत ठरली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने कोरोना व्हायरसच्या उद्रेकावर मात करण्यासाठीची घोषणा जाहीर केल्यानंतर औद्योगिक धातूंना काही प्रमाणात आधार मिळाला. जगभरातील औद्योगिक क्षेत्रे दीर्घकाळ बंद राहिल्यास औद्योगिक धातूंच्या विकासास खीळ बसेल, त्यामुळे हा आधारही मर्यादितच राहील. चीनममधून प्रसारीत झालेला कोरोना व्हायरस १२० देशांमध्ये पोहोचला असून यामुळे बाजारपेठांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर मालमत्ता विकत आहेत. आमच्या अंदाजानुसार, साथीच्या रोगाचा फटका अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र असू शकतो आणि लॉकडाऊन संपल्यानंतरही औद्योगिक प्रक्रिया सुरू होण्यास दीर्घ कालावधी लागू शकतो..”
तांबे:
“बुधवारी, एलएमई कॉपरच्या किंमती ०.८ टक्के वाढून ४८० डॉलर प्रति टनांवर बंद झाल्या. अमेरिकेने जाहीर केलेल्या मोठ्या आर्थिक मदतीच्या घोषणेनंतर लाल धातूच्या किंमतींना आधार मिळाला. कोरोना व्हायरस संपूर्ण देशभरात पसरल्यापासून चीनच्या कॉपर कॉन्सन्ट्रेट प्रोसेसिंगचे शुल्क पहिल्यांदाच घसरले.”